वेळ झाली निघून जाण्याची...


अंक : लोकसत्ता, रविवार विशेष २००३

लेखाबद्दल थोडेसे  : सुरेश भट आणि मराठी गजल हे समानार्थी शब्द आहेत. मराठीत गेल्या तीस-चाळीस वर्षात गजल लिहिणारे गल्लोगल्ली झाले. परंतु एखादा उत्तम शेर, एखादी चांगली गजल जमली की तीच आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचणारांची संख्याच अधिक. सुरेश भटांनी मात्र प्रत्येक गजल सारख्याच वजनाची लिहिली. कोणतीही गजल घ्या, तीत त्यांच्या प्रतिभेचे प्रतिबिंब दिसतेच. या गजलांना जेंव्हा स्वरसाज चढतो तेंव्हा ती एखाद्या सुंदरीनं शृंगार करावा तशी रसिकांना भेटते. गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी अनेक मराठी गजलांना असा स्वरसाज चढवला आहे. पांचाळे यांची गजलशी पहिली गाठ पडली ती भटांच्या साक्षीनेच. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख पांचाळे यांनी लोकसत्तामध्ये लिहिला होता.

भीमराव पांचाळे हे केवळ संगीतकार नाहीत तर त्यांनी अनेक नव्या गजलकारांनाही प्रकाशात आणले, गजलची चळवळच राज्यभर उभी केली.  त्यांनी स्वरबद्ध केलेल्या भटांच्या काही गजलांचा उल्लेख प्रस्तुत लेखात आहेच. या शिवाय, इतर काही गजलकारांच्या 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा', 'मी किनारे सरकताना पाहिले', आयुष्य तेच आहे अशा इतरही अनेक अप्रतिम गजला भीमराव यांनी बांधलेल्या आहेत. हा लेख वाचल्यावर त्याही जरुर ऐका.

********

“हे पाह्य, मी तुले सांगून ठेवतो भीमराव – येणारा काळ गजलाचाच आहे... लक्षात ठेव!”

हे ब्रह्मवाक्य ठासून मनावर बिंबवणाऱ्या मराठी गजलच्या खलीफाला मृत्यू घेऊन गेला...

मराठी गजल पोरकी झाली...

सुरेश भटांच्या तब्येतीतील चढउतार बराच काळ बघत होतो. त्यामुळे घडले ते फार अनपेक्षित नव्हते, तरीही त्यांच्या जाण्याने निर्माण झा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


लोकसत्ता , मृत्युलेख​ , व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.