थोरांमोठ्यांचे अंतकाल

अंक : आनंद, ऑगस्ट १९३६

लेखाबद्दल थोडेसे : गोविंद सखाराम सरदेसाई  (१७ मे १८६५-२९ नोव्हेंबर १९५९) यांना महाराष्ट्र रियासतकार सरदेसाई म्हणूनच ओळखतो. इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संशोधन करुन संकलित केला.  ब्रिटिश  रियासत व मराठी रियासत असे त्याचे दोन खंड हे त्यांचे अनमोल कार्य म्हणाले लागेल.  इतिहासलेखनात भावनांपेक्षा पुरावे आणि सत्य सांगण्याचे धैर्य अधिक महत्वाचे असते हे सरदेसाई यांच्या लिखाणातून दिसते. त्यांच्या निधनानंतर साठ वर्षांनी आज अस्मिता आणि भावना एवढ्या तीव्र झाल्या आहेत की सत्य सांगण्याचे, ऐकण्याचे आणि पचवण्याचे धाडस मराठी समाजात राहिलेले नाही. सरदेसाई यांनी अनेक अंगाने इतिहासाचा अभ्यास केला. थोरामोठ्यांचे अंतकाल हा त्याचाच ऐक पैलू. मरणोत्तर आयुष्यावर प्रगाढ श्रद्धा असलेल्या आपल्या अध्यात्मिक परंपरेत ‘अखेरचे क्षण’ विविध अर्थानी महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा विविध मृत्यूंचा अतिशय समर्पक असा धांडोळा सरदेसाई यांनी या लेखात घेतला आहे.  जवळपास ८५ वर्षे जूना असलेला हा लेख आज आणि पुढील काळात अधिकाधिक महत्त्वाचा ठरणार आहे. ‘पुनश्च’ने हा लेख मासिकांच्या फडताळातून बाहेर काढून, तो पुन्हा टाइप करुन डिजिटल स्वरूपात वाचकांसमोर आणलेला आहे, याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो. अन्यथा, एवढा उत्तम लेख भूतकाळात गडप झाला असता. अवश्य वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. kishorpatil

  वाचकांसाठी ही एक चांगली सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले पाहिजेत.
  वैचारिक ऐतिहासिक लेखांसोबत ललित लेख.. विनोदी लेखही हवेत. अर्थात असतील. अजून पाहिले वा वाचले नाहीत. दाभोळकर,
  आ. ह. सांळुखेंसारखे ही वेगळे विचार मांडणाऱ्यांचेही संग्रही असावेत.
  ललित अंकातील अलाणेफलाणे असावा (दळवी)
  अर्थात असेल हे. पाहू. वाचू. एक म्हणेन घरपोच दूरस्थ वाचनालय… स्वस्त, सुलभ वाचनालय सुरू केल्याबद्दल ग्रामीण भागातील आमच्या सारख्या वाचकांची सोय केली त्याबद्दल धन्यवाद

 2. sratnadurga@gmail.com

  भारदस्त भाषा आणि मुद्देसूद मांडणी आणि माहिती ही या लेखाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. एक चांगला लेख वाचायला मिळाला.

 3. mukunddeshpande6958@gmail.com

  फारच छान

 4. udaymanerikar1967@gmail.com

  सुंदर लेख, खूप महत्वाची माहिती वाचायला मिळाली.

 5. hemant.a.marathe@gmail.com

  पुनश्च ने एक उत्तम माहितीपूर्ण लेखाची मेजवानी आम्हाला दिली, खूप खूप धन्यवाद

 6. amolss

  केवळ अप्रतिम..पुनश्च चे आभार

Leave a Reply