पावसाशी लढाई

पुनश्च    अशोक चितळे    2020-08-29 06:00:47   

अंक – सत्यकथा, जून १९५१

लेखाबद्दल थोडेसे : हा लेख आहे सत्तर वर्षे जूना. हो, सत्तर वर्षांपूर्वी सुध्दा आपल्या हवामान खात्याचे अंदाज बरोबर येत नव्हते. म्हणजे गेली सात दशके ते प्रामाणिकपणे चूकीचे अंदाज व्यक्त करत आहेत. हा लेख वाचताना आपण हवामानखात्याचा असा उल्लेख वाचतो तेंव्हा वाटते, खरेच काय बदलले गेल्या सत्तर वर्षात? किमान या लेखात ज्या मानवी वृत्तींवर तिरकस भाष्य आहे ती तरी अजिबात बदललेली नाही...वाचा म्हणजे कळेल. एक इशारा- हा विनोदी लेख अधूनमधून 'वैज्ञानिक' होतो, पण अखेरपर्यंत विनोदाचा 'कोट' मात्र सोडत नाही.पावसाळा संपला की, त्याच्याबरोबर छत्र्या-रेनकोटांची जरुरीही संपते. पण कित्येकांच्या छत्र्या अगोदरच बेपत्ता झालेल्या असतात. छत्र्यांना वाटा अनेक. कधी मित्र उसनी नेतात, कधी मालकच कुठेतरी विसरतात किंवा कधी चोर लंपास करतात. यांतून वांचून ती मालकाच्याच आश्रयाला टिकून असली तर त्याचे कारण म्हणजे तिच्या काड्या मोडलेल्या असतात, नाही तर कापडाला भोके पडलेली असतात, नाहीतर दांडा मोडलेला असतो, किंवा घोडा तरी पुढून गेलेला असतो. छत्रीच्या डॉक्टरला ती दाखवली तर तो गंभीरपणे सल्ला देतो की दांडा-काड्या बदलून कापड नवे टाकले की, छत्री एकदम नव्यासारखी होणार!

रेनकोटचा त्रास वेगळ्या तऱ्हेचा. तो मोडत नाही किंवा कोणी मागतही नाही; पण लडीवाळ मुलाप्रमाणे त्याला नेहेमी कडेखांद्यावर वागवावे लागते. पावसाळाभर हे ओझे वाहून गंपूनानांचे खांदे असे तयार झाले आहेत की, दोनचार मण कांदेबटाटे, दहा बारा नारळ आणि पांचसहा भोपळे येवढी मंडई ते सहज वाहून आणतात. पाऊस व रेनकोट यांच्या परस्परशत्रुत्वाचा अनुभव तर सर्वांना असेलच. पाऊस येण्याचा रंग दिसतो म्हणून कोट बरोबर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


विनोद , सत्यकथा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.