अंक : अलका, दीपावली, १९५६ लेखाबद्दल थोडेसे : लोकमान्य टिळकांच्या मृत्यूला आज बरोब्बर १०१ वर्ष होत आहेत. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांनी देह ठेवला तेंव्हा महाराष्ट्रात शोकाची लहरच उसळली होती. टिळकांची विद्वत्ता, कणखर स्वभाव, प्रखर देशभक्ती आणि देशासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कष्ट झेलण्याची तयारी याला तोड नाही. टिळकांच्या पहिल्या तुरुंगवासापासून तर शेवटच्या तुरुंगवासापर्यंतच्या कारागृहातील त्यांच्या वास्तव्याचा वृत्तांत हा लेख सांगतो. आगरकरांसह टिळक पहिल्यांदा तुरुंगात गेले तेंव्हा ते सव्वीस वर्षांचे होते. या वृत्तांतातून टिळकांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचा नेमका अंदाज येतो. वृत्तांत लिहिलेही असे आहेत की जणू लेखक स्वतःही त्यावेळी तुरुंगातच असावा. टिळकांच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांनी हा लेख लिहिला गेला होता. लेखक वि. श्री .जोशी हे इतिहास संशोधक, लेखक मुळचे ठाण्याचे होते. त्यांनी मुंबई महापालिकेत नोकरी केली आणि विपुल लिखाण-संशोधन केले. लेख एवढ्या सहज ओघवत्या भाषेत आहे की तो एकदा सुरु केला की सोडवत नाही, आणि आज आपल्याला अती परिचित झालेला क्वारंटाइन हा शब्द १९५६ सालच्या लेखात वाचताना गंमतही वाटते. स्मृतीशताब्दी निमित्त लोकमान्यांना 'पुनश्च'चे त्रिवार वंदन. ******** लो. टिळकांना पहिली शिक्षा झाली ती केवळ अप्रत्यक्ष राजकीय कारणासाठी होती. त्यावेळी त्यांचे वय सव्वीस होते. कोल्हापूरचे त्या वेळचे दिवाण बर्वे यांचेवर त्या वेळच्या कोल्हापूरच्या महाराजांना क्रूर वागणूक दिल्याचे आरोप करणारे लेख आणि तशा आशयाची त्यांची, (पुढे त्यांची नाहीत असे सिद्ध झाले,) अशी पत्रे केसरींत प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचेवर आणि आगरकरांवर बर्व्यांनी ल
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीऱ्हदयस्पर्शी लेख .
jsudhakar0907
5 वर्षांपूर्वीध्येयासक्ती, विचारांशी असणारी अभेद्य अशी निष्ठा, त्यागी वृत्ती, संघर्षशीलता, कणखरपणा, बाणेदारपणा सगळंच परमोच्च ! लोकमान्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !!! 'बहुविध' ला मनःपूर्वक धन्यवाद !
prithvithakur1
5 वर्षांपूर्वीखूप छान लेख.धन्यस्त्रिलोकी तिलक: स एक ।
rajandaga
5 वर्षांपूर्वीखुप छा न वाचानिय
[email protected]
5 वर्षांपूर्वीधीरोदात्तपणे जगणारे नेते म्हणजे काय?हीगोष्ट हा लेख वाचून कळले आणि इंग्रज कसे महा हलकट होते हेही समजते.टिळक व्यासंगी होते आणि कारागृहात देखील त्यांचा व्यासंग सुरूच होता, हे देखील समजले.अप्रतिम लेख आणि उपलब्ध करणाऱ्या 'बहुविध 'चे धन्यवाद.
[email protected]
5 वर्षांपूर्वीकारावास त्यांनी धीरोदात्तपणे सहन केला .लेख मनाला वेदना देउन जातो।तुरुंगात ही ,हे सर्व कष्ट सहन करून ही.लोकमान्य कर्मयोग्या प्रमाणे कार्य करीत राहिले.