एक नवी सुरुवात


दूरदर्शन सुरू झालं तेव्हापासून आम्ही ‘बघे’ होत गेलो आणि आता तर वेगवेगळ्या इतक्या वाहिन्या चोवीस तास चालू असतात की जणू आमचं घर त्यांनी ओलिस ठेवलं आहे.... पण ह्याचा अर्थ सगळाच अंधार झाला आहे असं नाही. अशाही परिस्थितीत घरी टेलिव्हिजन नाही असं घर दिसतं. मोबाइलवर अवलंबून नसणारा माणूस दिसू शकतो. काल-परवापर्यंत गुलजार कटाक्षाने मोबाइलपासून दूर होते पण ए. आर. रेहमानने त्यांना भारी स्मार्ट फोन दिला आणि हा मोहरापण गळाला. ह्या संबंधात त्यांची कवितापण आहे म्हणे. असं म्हणण्याचं कारण हे मला गुलजार ज्यांना, 'मराठीतला माझा अ अरुण पासून सुरू होतो' असं म्हटलं आहे त्या अरुण शेवते यांनी सांगितलं. पण ती कविता मात्र अजूनपर्यन्त तरी त्यांनी मला दिलेली नाही. पण मला खात्री आहे ते आता कदाचित मला देतील. नाहीतर मग गुलजार यांच्या येणाऱ्या कवितासंग्रहाची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात.... तर सांगायची गोष्ट म्हणजे आत्ताही परिस्थितीनं वाचन संस्कृती टिकून आहे. ज्यांना वाचनाची सवय आहे त्यांची गोष्ट निराळी. नव-नवे वाचक कसे निर्माण होतील ह्याचा विचार व्हायला हवा. विशेषतः नव्या पिढीकडे हा वारसा कसा पोचवता येईल ह्याचा विचार व्हायला हवा.  त्यासाठीच विविध उपक्रम राबवायला सुरुवात झालेली दिसते. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे १५ नोव्हेंबर, अब्दुल कलाम यांची जयंती – वाचन प्रेरणा दिन म्हणून आता साजरा होऊ लागला आहे. ही संकल्पना मंत्रीमहोदय विनोद तावडे यांची. महाराष्ट्र सरकारचे असे पाठबळ असल्याने हा वाचक दिवस रुजेल असं वाटतं. शिवाय खुद्द विनोद तावडे यांनी यात व्यक्तिशः अधिक लक्ष घातल्याने हा वाचक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    छान माहिती..व्हीलर बुक स्टॉलची जन्मकथा प्रथमच कळली..

  2. prashantghodake

      7 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहिती !!!

  3. Prashant Jagtap

      7 वर्षांपूर्वी

    Very good article ?

  4. मोहिनी पिटके

      7 वर्षांपूर्वी

    योजक दुर्लभ असतो हे जरी खरे असले तरी अगदीच दुर्मिळ नाही . समाजात पुढाकार घेऊन अशा रचनात्मक उपक्रमांची सुरुवात आणि पाठराखण आवश्यक आहे . माझ्याकडे किराणा माल पोचता करणाऱ्या मुलाने शेक्सपियर विषयी चार गोष्टी सांगून अचंबित केले होते .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen