परशुरामाचा परिसर

अंक: केसरी दिवाळी अंक १९७२ 

संगमेश्वर आलं. गाडी थांबली. चहा घेतला. तो बेचव होता. कोकणातल्या कुठल्याही बाजारपेठेत जा. घोटभर चांगला टेसदार चहा कुठे मिळेल तर शपथ. नुसतं रंगीत पाणी उकळतात. त्यात दुधाचा थेंब टाकल्यासारखं करतात. ते मिश्रण प्यायला भाग पाडतात. पैसे मात्र चक्क वाजवून घेतात. त्यामुळे मनाचा वैताग झाला होता. तशात उन्हं तापली होती. वारा पडला होता. संगमेश्वरच्या बकाल बाजारपेठेत बघण्यासारखं काहीही नाही. अशा भकास गावात लोक दिवस कसे काढीत असतील? गावाला एक सोडून दोन नद्यांचा नजराणा मिळालेला आहे. मात्र लेखक खुबीनं रंगवतात, किंवा चतुर चित्रकार गडद रंगाचे फराटे मारून दाखवतात तशा आरस्पानी सौंदर्याचं कुंकू दोन्ही नद्यांच्या भाळी बाजारपेठेतल्या त्यांच्या वळणावर लागलेलं नाही. कुठल्याही सामान्य कोकणी नद्यांसारख्याच त्या रोड दिसतात. काठ गच्च झाडीनं भरलेले आहेत. त्यावरचे कावळे गप्प-गप्प आहेत.

एके काळी अरबांची गलबतं ह्या संगमेश्वराच्या बंदराला लागायची. त्यामुळे संगमेश्वर हे पूर्वीच्या काळी व्यापाराचं केंद्र होतं. अजूनही अरबांची गलबतं ह्या बाजूला हमेशा येतात म्हणे. पण बंदराला बिलगत नाहीत. दृष्टीच्या पल्ल्याच्या पलीकडे दूरवर अरबी समुद्रात उभी रहातात. त्यांच्या खाणाखुणा होतात. संकेत ओळखून त्यांचे इथले प्रेमिक त्यांच्याकडे झेपावतात. गाठभेट होते. खुषी होते. भेट घेऊन ते जड पायांनी किनाऱ्याकडे परत येतात. अरबांचा सागरी व्यापार उदीम फारच तेजीत चालतो. हॉटेलमधला एक पॅसेंजर प्रौढी छाटीत म्हणाला, ‘‘तुम्हाला इथल्या लोकांचा भपका बघायचा असेल तर इथे तिठ्यावर काय दिसणार धोंडे?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 13 Comments

  1. Dhirubhai

    व्वा फार छान लेख ,शब्दांनी डोळ्यासमोर कोकणात गेल्यासारखे वाटले

Leave a Reply