सखीच्या शोधात जॉर्ज ऑरवेल

असत्याचे बेदिक्कत वाभाडे काढणारा सत्यव्रत योद्धा कादंबरीकार म्हणून जॉर्ज ऑरवेलची कीर्ती जाणत्यांच्या जगात मंजूर आहे. कितीही मिट्ट काळोख असो, वा भुलभुलैय्या, ऑरवेलला सत्याचा किरण नेमका दिसे. मात्र, ही अलौकिक सिद्धी ह्या ब्रिटिश लेखकाच्या पदरात अवचित पावसासारखी काही अचानक पडली नाही. अवघं शेहेचाळीस वर्षांचं औटकं आयुष्य लाभलं.  त्यातली त्याची पहिली चाळीस वर्षं प्रत्यक्ष अनुभव वेचण्याच्या भरात खणाखणी करण्यात गेली. पैसे जेमतेम सुटले. अगदी कमीत कमी मानधन देऊ शकणाऱ्या ‘ट्रीब्यून’चा तो लेखक होता. धारदार स्तंभलेखक, वैचारिक निबंधकार, निपुण कादंबरीकार आणि कपटी राजकारणाच्या यंत्राची रचना स्पष्टपणे पाहू शकणारा हिकमती, म्हणून त्याने बहुत काळ उमेदवारी केली. तडजोडीचं नाव न काढता लेखणी कायम परजली. युद्धखात्यात नोकरी केली. काही काळ लंडनच्या बी.बी.सी.वर तो भाषण विभागाच्या प्रोड्यूसर होता. प्रसंगी त्याने कॅन्टीनही चालवलं. पण चळचळीत  संपत्ती अशी त्याला कधीच दिसली नाही. त्याची आवक यथायथाच होती.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 9 Comments

 1. ऑरवेलचा जन्म भारतातला (बिहार मधील मोतीहारी या गावातला). त्याचे वडील ब्रिटीश सरकारचे नोकर होते. बालपणातील उणीपुरी १० वर्षे त्याने भारतात काढली नि तो शिक्षणासाठी ब्रिटन मध्ये गेला.
  बी.बी.सी. मध्ये नोकरी करण्यापूर्वी तो स्वतः ब्रह्मदेशात ब्रिटीश सैन्यात नोकरी करीत होता. बर्मीज डेज ही त्याची ब्रह्मदेशातल्या अनुभवांवर आधारित. मोतीहारीमध्ये त्याचे स्मारक भारतीय सरकारने बांधले आहे.
  भारताविषयी आपुलकी, मात्र भारतीय स्वातंत्र्यलढयाबद्दल त्याला फारसे औत्स्युक्य नव्हते, भारतीय नेत्यांच्या क्षमतेविषयी तो संशयी राहिला.
  नेहरू मंत्रीमंडळातील एक कृष्ण मेनन हे जॉर्ज ऑरवेलच्या मित्रांपैकी एक. नेहरूं एकंदर इंग्रजी प्रभावाखाली कायम असत. अटलबिहारी एक इंग्रजी नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांच्या बद्दल आदर. त्याच नियमाने कृष्ण मेनन यांची इंग्रजी साहित्यिकांशी असलेल्या जवळिकीचा असाही फायदा कृष्ण मेनन यांना नेहरूंच्या जवळ जाण्यासाठी झाला असे म्हणता येईल.
  ऑरवेल तंत्रज्ञानाच्या विरुध्द नव्हता, पण तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यप्राण्यांवर पाळत ठेवण्याची सोय तर सरकारी यंत्रणेकडे जाणार नाही ना याबाबत तो कमालीचा साशंक होता. ‘बिग ब्रदर इस वोचींग’ हेही त्याच्या अशाच धारणेतून व्यक्त झाले होते.
  भारतीय नेत्यांची क्षमता आणि तंत्रज्ञाविषयी (असे दोन्ही) साशंकता यामुळेदेखील त्याच्या दृष्ट्यावृत्तीची ओळख होते.

 2. orwel and pinge, solid combination

 3. या क्षणी मी सॅन डीएगो येथील एका इप्सितळात आहे। तेथील एक डॉक्टरला बघितल्यावर मला त्याचा चेहेरा ओळखीचा असावा असं नवाटायला लागलं। तेथेच वाट बघत असताना हा लेख वाचला, आणि लक्षात आलं की तो अगदी ऑरवेल सारखाच दिसतोय। लेख अप्रतिम, पिंग्याच्या शैलीत

 4. सर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते
  अस्वस्थ करणारा लेख

 5. आभार .

 6. आॅरवेलची जीवनकहाणी भन्नाट. .. धन्यवाद!

 7. Apratim!

 8. सुंदर लेख, केवळ पुनश्च मुळे हे लेख वाचायला मिळतात.

 9. इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा नियतिने केलेला हा दारुण पराभवच

Leave a Reply

Close Menu