पारिजात' जानेवारी १९३४ १) साधूंच्या संगतीतश्रीअच्युतबाबा म्हणून दक्षिण हैद्राबादेत एक सत्पुरुष काही वर्षाखाली होऊन गेले.त्यांचे दर्शनास इतर अनेक लोकांबरोबर एक विद्वान गृहस्थ एकदा गेले होते. लोकोपचाराप्रमाणे वंदन करून ते खाली बसले व काही तरी बोलायला पाहिजे म्हणून म्हणाले :"आम्ही काही आत्मस्तुति परनिंदा सोडून दिली आहे !" अच्युतबाबानी ते ऐकले व नेणतेपणाची मुद्रा धारण करून त्यास विचारले,"आपण काय म्हणालात ते समजले नाही." सभा तटस्थ झाली. तो गृहस्थ पुन्हा म्हणाला "अर्थ उघड आहे." बाबा म्हणाले ,"तोच तर सांगा." लोक उमगले व तो गृहस्थही उमगून वरमला ! आमचे काही वाचक अजूनही उमगले नसतील तर त्यांचेसाठी फोड केली पाहिजे. बाबांचा भावार्थ असा की "मी आत्मस्तुती परनिंदा सोडून दिली आहे " असे म्हणण्यात आत्मस्तुती होते व परनिंदाहि होते ! मी आत्मस्तुती सोडून दिली आहे या म्हणण्यातच आत्मस्तुती होते व मी परनिंदा करीत नाही असे म्हणण्याने दुसरे परनिंदा करितात हा ध्वनी निघून परनिंदाहि घडते ! 'मौनं सर्वार्थसाधनमं !' अंक: मुमुक्षु २) समता एका मोठ्या माशाने एका लहानग्या माशाला गाठले!
त्याला गिळण्याचा विचार होता त्याचा! धाकटा मासा जीवावर उदार होऊन ओरडला ,"अन्याय ! अन्याय ! मला सुद्धा जगण्याची इच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कथा
, मासिक पारिजात
, मुमुक्षु
sakul
8 वर्षांपूर्वीसुंदर कथा...