दिवाळी अंकः ललित – १९६९ लेखाबद्दल थोडेसे : Anecdotes या इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा मराठी शब्द आहे, 'किस्से', परंतु त्यातूनही पूर्ण अर्थ प्रतीत होत नाही. प्रत्येक क्षेत्रात अशा काही घटना घडत असतात, ज्यांना इतिहास म्हणून फार महत्व नसते, क्वचित ते 'गॉसीप'ही असते परंतु तरीही त्याला रंजनमूल्य असते, त्यांची नोंद झाली तर त्यातून आपोआपच एका इतिहासाची नोंद होते. इंग्रजीत जवळपास प्रत्येक क्षेत्रातील असे किस्से आणि मार्मिक निरिक्षणे प्रसिद्ध होत असतात. आजच्या लेखालाही मराठीतील anecdotes म्हणता येईल आणि त्याचा विषय अतिशय मनोरंजक आहे. अर्पणपत्रिका हा अनेक किवा जवळपास सर्वच लेखकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 'माझी पत्नी सौ अमूक तमूक, चिरंजीव अलाणे आणि कन्या फलाणे यांनी घरातील कामांचा बोजा माझ्यावर कधीच टाकला नाही म्हणूनच मी हे लेखन पूर्ण करु शकलो' अशा अर्पणपत्रिकांची संख्या तर शेकडो-हजारोंच्या घरात असेल. हे लटांबर अनेकदा सून, जावई आणि गोड नातवंडे इथपर्यंतही जाते. तर लेखक श्री.ज. जोशी यांनी या लेखात अर्पण पत्रिकांचा जो काही धांडोळा (आणि हजेरी) घेतली आहे तिला तोड नाही. दुर्देवाने या पद्धतीचे लिखाण मराठीत फार नाही. श्री.ज. जोशी हे विपुलप्रसवी लेखक होते. 'आनंदी गोपाळ' या कादंबरीमुळे त्यांचे खरे नाव झाले तरी त्यांच्या कथा, कादंबऱ्यांची संख्या मोठी आहे. सामाजिक, चरित्रात्मक, भाषांतरित अशा विविध प्रकृतीच्या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी ललितलेखनही भरपूर केले. त्यांच्या ललितलेखनाला सौम्य विनोदीचा छानसा पदर असे, त्याचा अनुभव हा लेख वाचतानाही येतो. हा पन्नास वर्षांपूर्वीचा लेख वाचता ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चिंतन
, निबंध
, ललित मासिक
Vilas Shamrao Wagholikar
5 वर्षांपूर्वीजीए कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका विचार करायला लावणाऱ्या होत्या.
jrpatankar
5 वर्षांपूर्वीलेख छान पद्धतीने मांडला आहे. हा एक चांगला संशोधनाचा विषय होऊ शकतो.
[email protected]
5 वर्षांपूर्वीवेगळ्या विषयांवरचा छान लेख.
asiatic
5 वर्षांपूर्वीगमतीदार व वाचनीय लेख. विषयही वेगळा आहे. निरीक्षणे छान.
vishwasdeshpande
5 वर्षांपूर्वीलेख वाचून मनापासून आनंद वाटला किती तरी वेगळी माहिती मिळाली.
[email protected]
5 वर्षांपूर्वीविषयाची नाविन्यपूर्ण मांडणी
[email protected]
5 वर्षांपूर्वीनवा विषय ,नवी माहिती
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीखुपच सुंदर . वेगळ्याच विषयावरचा लेख वाचायला मिळाला . धन्यवाद !
SubhashNaik
5 वर्षांपूर्वीखूपच सुंदर, वाचनीय लेख आहे. या विषयावर अन्य कुणी लिहिले आहे का, पाहिले पाहिजे. - सुभाष नाईक, पुणे