अंक : उद्यान, फेब्रुवारी १९१९ लेखाबद्दल थोडेसे : आजचा लेख फेब्रुवारी १९१९ साली उद्यान मासिकात प्रसिद्ध झाला होता. शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला लेख आपण वाचतो आहोत, या कल्पनेनेच आधी अंगावर रोमांच उभे राहतात आणि हा लेख आपण जसजसे वाचत जातो तसे तो खरोखरच शब्दांमधून काळाची सफर घडवून आणतो. चाळ नावाची वस्ती आता मुंबई पुण्यात केवळ नावालाच राहिली आहे आणि तिची जागा 'सोसायटी' या शब्दाने घेतली आहे. शंभर वर्षांपूर्वी 'चाळ' ही कल्पना नुकतीच आली होती आणि या 'खुराड्यां'विषयी अनेकांना कुतुहल होते. टिचभर जागेत राहणाऱ्यांची अनेकांना कीव येत असे, टिंगल टवाळीही होत असे आणि त्याचवेळी चाळींनी सामुदायिक जगण्याची जी नवी संस्कृती जन्माला घातली तिच्याबद्दल उत्सुकताही असे. आपले खरे नाव काळाच्या उदरात तसेच ठेवून 'चाळ प्रिय' असे टोपण नाव धारण करुन कोणी तरी हा लेख लिहिलेला आहे. लिहिणारी व्यक्ती नामवंत होती की हौशी ते कळण्याचा काही मार्ग नाही, परंतु लिखाणाची शैली मात्र सराईत लेखकाची आहे. आपल्या वाचकांत कोणी माहितगार असेल तर या चुरचुरीत, रंजक आणि टोमणे मारण्यात पटाईत अशा या अज्ञात लेखकावर प्रकाश टाकतीलही. ********* चाळ हा शब्द दिसण्यांत अगदी लहान, दोनच अक्षरांचा, आणि उच्चारावयाला अगदी सोपा, असा जरी असला तरी या दोन अक्षरी शब्दांत काय गूढ आहे, याचा यथार्मात विचार करण्याचं योजिले आहे. एखादी वस्तू अगदी साधी असली, किंवा पुष्कळ परिचयाने साधीशी वाटली तरी देखील किंचित् चिकित्सक दृष्टीने पाहू लागलो असतां तीत काय गूढ भरले आहे याची आपणाला ज्याप्रमाणे बरोबर कल्पना होते आणि मग आपल्याला ती गोष्ट कांही तरी विशेष आहे असे वाटू लागते तद्वतच सांप्रत “चाळ” या शब ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीछान लेख
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
jrpatankar
5 वर्षांपूर्वीलेखन सराईताचे पण नाव गुप्त. का.तर लेखन उद्योगासाठी लिहित असल्याने हौशी असावा. चि.वि.जोशी का.
[email protected]
5 वर्षांपूर्वीलिखाणाची भाषा खूप छान आहे
shripad
5 वर्षांपूर्वीअजून चाळी असाव्यात का? आता या चिनी विषाणूंच्या दिवसात कसे राहत असतील तिथे सगळे?