छोट्या भाऊची सांगली

पुनश्च    वि. स. खांडेकर    2020-11-04 14:47:58   

लेखाबद्दल थोडेसे: वि. स. खांडेकरांच्या ‘एका पानाची कहाणी’ या आत्मचरित्रातील काही भाग ‘आलमगीर’च्या १९६०च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता, तोच हा लेख. या लेखात खांडेकरांनी त्यांच्या बालपणाचे वर्णन केलेले आहे. बहुतेक आत्मचरित्र लिहायला त्यांनी सुरुवात केली तो हा काळ असावा. त्यांचा जन्म १८९८ साली झाला, तो जर १९९८ साली झाला असता, तर आपण चंद्रावर रहायला गेलो असतो, असे त्यांना १९६० साली वाटत होते. पुढल्या काही वर्षातच माणूस चंद्रावर गेला, मात्र तिथे वस्ती करणे त्याला अद्याप जमलेले नाही.

हे आत्मचरित्र ते बरीच वर्षे लिहित असावेत कारण फेब्रुवारी १९७० मध्ये ललितला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ‘आत्मचरित्र कधी पूर्ण करणार’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेंव्हा त्यांची दोनशे पानं लिहून झाली होती. स्वतःवर विनोद करीत त्यांनी आपले बालपण या लेखात सांगितले आहे. २ सप्टेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.

********

माझा जन्म चेरापुंजीला न होतां सांगलीला कां व्हावा हे सांगणे अशक्य आहे. तो १८९८ सालींच कां व्हावा हे कोडेही मला कधी उलगडले नाही. तो १७९८ मध्ये झाला असता तर नाना फडणवीस आणि बापू गोखले यांना मी पाहूं शकलो असतो असे नाही. मात्र महात्मा फुले व लोकहितवादी यांचे दर्शन मला खचित झाले असते. तो १९९८ साली व्हायचा असता तर—तर मी हे १९६० साली कसा लिहीत बसलो असतो? तसा जन्म मला मिळाला असता तर चंद्रावर नाना प्रकारच्या कल्पना करीत बसण्यापेक्षां मी त्याच्यावर राहायलाच गेलो असतो. अर्थात तिथे घरांची टंचाई आणि पागडी प्रकरण वगैरे मंडळी नसतील तर!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


आलमगीर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.