अंक : वाङ्मय शोभा, जानेवारी १९६०
शास्त्रज्ञ म्हणतात की हे स्पुटनिकचे युग आहे. राजनितिज्ञ सांगतात हे लोकशाही समाजवादाचे युग आहे. शिक्षणशास्त्रज्ञांना हे ‘मुलांचे युग’ वाटते. मी शास्त्रज्ञ, राजकारणी किंवा शिक्षणशास्त्रज्ञ यापैकी कोणीच नसल्यामुळे मला त्यांच्या युगांशी काहीच कर्तव्य नाही. माझ्या मते सध्या जर कोणते युग असेल तर ते रांगांचे आहे. उपहारगृहे किंवा चित्रगृहे, पोस्टाची कचेरी किंवा रेल्वे तिकिटघर किंबहुना सूतिकागृहापासून तो स्मशानापर्यंत कुठेही केव्हाही जा तुम्हा नेहमी स्त्रीपुरुष रांगेत वाट पाहत उभे असलेले दिसतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी लांबच लांब रांगा पाहिल्यावर व या रांगांत केव्हांना केव्हां अडकून पडण्याचा अनुभव घेतल्यावर हे रांगांचे युग नव्हे असे कोण म्हणेल?
आपल्या देशांतील लोकशाही ज्यावेळी बाल्यावस्थेंत होत त्यावेळी रांग चुकवून आपले काम चटकन् करून घेण्याचे एक फार प्रभावी साधन उपलब्ध होते. ते म्हणजे ‘स्त्री’. लवकर तिकिट मिळण्यासाठी रेल्वेऑफिसांत अथवा चित्रगृहांत मी माझ्या पत्नीला किंवा भगिनींना कितीदां तरी पाठवून घरांत स्वस्थ बसूं शकलो आहे. त्यावेळी रांगांची संस्था ही, स्त्री स्वस्थता मिळवून देऊं शकते हे सिद्ध करण्यासाठीच जन्माला आली की काय असे मला वाटत असे. बाकी स्त्री व स्वस्थता हे विरुद्धार्थी शब्द आहेत हे माझे पूर्वीचे मत अद्याप कायम आहे. काही मते उच्चरण्याजोगी नसतात एवढेंच. सत्य हे दाहक असते म्हणतात ना?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .