राहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)


अंक :किस्त्रीम दिवाळी अंक, १९८५

लेखाबद्दल थोडेसे : रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात असंख्य गोष्टी आपल्याला खुणावत असतात. अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. दरवर्षी नव्या उत्साहानं काही नवे संकल्प आपण करतो आणि ते राहून गेले म्हणून वर्षाच्या शेवटी हळहळतो. अगदी वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टीपासून ते थेट सामाजिक—राजकीय गोष्टींपर्यंत अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी वाढत राहाते. यातल्या काहीची चुटपूट लागते काही राहिल्या म्हणून सरळ खंतच वाटते. आयुष्य पुढे जाईल तसतशा त्या गोष्टी घडण्याची शक्यताही कमी होत जाते.तुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा या ‘राहून गेलेल्या गोष्टी’ आपण या आधीच्या भागात वाचल्या. आजच्या भागात जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘राहून गेलेल्या गोष्टी’ देत आहोत. पत्रकार आणि लेखिका संध्या टाकसाळे यांनी किस्त्रीमच्या दिवाळी अंकासाठी विविध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हा शोध घेतला आहे. 
***********

राहून गेलं खरं! - जयवंत दळवी 

आयुष्य थोडं असतं, करायचं खूप असतं, असं आपण नेहमी म्हणत असतो. ते काहीशा प्रमाणात खरंही असतं; पण सर्वार्थानं खरं असतं असं मात्र नाही. अनेकदा काही गोष्टी करणं शक्य असतं, पण जमत नाही—राहून जातं, एवढं खरं! मी शाळेत असल्यापासून माझ्या डोक्यात लेखनाची चक्र चालू असायची. आपल्याला लेखक व्हायचं आहे, असा एक ध्यास होता. बरा-वाईट कसाही असो, मी शेवटी लेखक झालो

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen