ती मंगलाष्टके अन् ते श्लोक


अंक वाड्मयशोभा, मे १९६०

लेखाबद्दल थोडेसे :  मंगलाष्टके न ऐकलेला माणूस विरळाच. इतरांच्या नाही तर किमान स्वतःच्या लग्नात तरी मंगलाष्टके निमूट ऐकावीच लागतात. शब्द वेगवेगळे पण चाल संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच, असा हा एकमेव काव्य-गान प्रकार असेल. वर- वधूंची, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे गुंफुन गावोगावचे हौशी कवी मंगलाष्टकांवर स्वतःचा ठसा उमटवत असतात. त्यातून अनेक विनोद घडतात परंतु लग्नाच्या घाईत किंवा खुशीत असणारी मंडळी त्या विनोदांचा आस्वाद घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. वऱ्हाडी मात्र याची मनसोक्त मजा लुटतात. कवी सोपानदेव चौधरी (१६ ऑक्टोबर १९०७ – ४ ऑक्टोबर १९८२) हे जेवढे रसाळ कवी तेवढेच रसाळ लेखक. त्यांनी या लेखात मंगलाष्टकांच्या नाना तऱ्हांविषयी लिहिताना जी काही धमाल केली आहे, ती जबरदस्त मनोरंजक आहे. फक्त अट एकच – हा लेख वाचताना त्यात दिलेली मंगलाष्टके त्या ‘खास’ चालीत म्हणून बघा, तरच या लेखाची खरी मजा घेता येईल... तर होऊन जाऊ द्या !

********

लग्नसराईच्या दिवसांत माझ्या लहानपणी नाना प्रकारचे विचार यायचे, अगदी येऊ नये ते यायचे; लग्न, हा शब्दच मुळीच चुटकी वाजवल्याप्रमाणे वाटत असे. माझे एक चुलत मामा म्हणायचे, “अरे लग्न लग्न म्हणजे काय चुटकीसरशी झालं पाहिजे!” हाच आकार माझ्या मनांत बिंबला असावा. मंगलाष्टके गाणार भटजी केवळ सूर्यास्त पहावयाला मिळावा म्हणून शक्य तितक्या उंच जागेवर जातो याची मला कल्पना नव्हती. तो शक्य तितक्या उंच ठिकाणी म्हणजे आपण गायिलेली मंगलाष्टके देवालाही ऐकूं जातील या कल्पनेने जात असावा असे वाटे. मी पहिल्या प्रथम मंगलाष्टके ऐकली ती आमच्या नारायण भटजींची. त्यांचा आवाज फार गोड असे. ‘कुर्यात सदा मंगलम्’ म्हटले की, जिकडे तिकडे चोहिकडे मांगल्य भरल्यागत वाटे. परंतु या स्थितीतही एक गोष्ट माझ्या मनाला खटकत असे. लग्नसमारंभांत विशेषतः वराच्या आईचा-वरमाईचा मोठा तोरा! ती नेहमी कुर्ऱ्यात वागायची याच प्रमाणांत वर पक्षाच्या बाजूला कुर्रा वाढीला लागत असे. ही माणसे अशी कुर्ऱ्यात वागतात म्हणून तर नारायण भटजी “कुर्यात् सदा मंगलम्” म्हणत नसेल ना? एक ना दोन विचार माझ्या जरतारी टोपीखाली गोंधळ घालीत असत. तसे म्हटले तर मंगलम्, हा शब्द माझ्या हृदयांत घर करून बसला होता. मला तो फार आवडे. मग मंगलम् हे कुर्ऱ्यात कसे होईल? मी फार बेचैन होत असे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वाड्मयशोभा , ललित

प्रतिक्रिया

  1. CHARUDATTA SHENDE

      7 महिन्यांपूर्वी

    मस्त ! खूपच सुंदर शैलीत लिहिले आहे. खुसखुशीत लेख वाचल्याचे समाधान मिळाले .वाचण्यासारखे अजून काही ...