अंक – रसना, जानेवारी १९४८
लेखाबद्दल थोडेसे : दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे,कथा-कवितांचे विश्लेषण करुन त्या त्या वर्षाचे एक समग्र चित्र मांडायचे ही अतिशय चांगली प्रथा अलिकडे लोप पावताना दिसत आहे. खरे तर अशा प्रकारच्या आढाव्यातून एकत्रितपणे वातावरणाचा अंदाज येत असतो. १९४७ साली म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कुठले राजकीय-सामाजिक विषय समाजाच्या डोक्यात घोळत होते, त्याचा अतिशय सुंदर असा आढावा आजच्या लेखात घेतलेला आहे. मूळ लेख जानेवारी १९४८च्या ’रसना’च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचताना आपण त्यातील मुदद्द्यांचे गेल्या काळाच्या संदर्भात आपसूकच परिशिलन करतो. या धर्तीवर असा आढावा पुन्हा सुरु व्हायला हरत नाही. लेखाच्या लेखकाने आपली ओळख ‘एक गंभीर वाचक’ अशी दिली आहे, यावरुन लेखातील मुद्दे थोडे वादग्रस्त आहेत याची कल्पना येते...................
दिवाळी म्हणजे चमचमीत जेवण आणि चुरचुरीत वाचन! जड अन्न हलके (लाइट) वाचन! आपण दिवाळी याप्रमाणे पार पाडली. पुन्हा ही स्वातंत्र्यातली पहिली दिवाळी! आतां दिवाळीनंतर थोडेसे गंभीर व्हावयास हरकत नाही. दिवाळी अंकांतल्या कथा, कविता इत्यादी मजकुराच्या आसपास राजकीय, सामाजिक इत्यादी विषयावर जे लेखन झालेले आहे त्याकडे वाचकांचे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी हे धावते टांचण केले आहे.
नव्या राजवटीत जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यांत अनेक प्रश्न चर्चेचा विषय झालेले आहेत. जमातींचे संबंध, भाषा, प्रांताप्रांताचे संबंध, भाषा भाषांचे संबंध, आर्थिक संबंध अशा अनेक प्रश्र्नांची चर्चा दिवाळी अंकांतून झालेली आहे. इतका आणि इतका गंभीर मजकूर यापूर्वी दिवाळी अंकांत क्वचितच आला असावा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीछान लेख आहे.