वहिदा, माला आणि दिवाळी

पुनश्च    शांताराम खळे    2020-12-16 06:00:01   

अंक : अनुराधा, दिवाळी विशेषांक १९६२

लेखाबद्दल थोडेसे : चित्रपटांमधून राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सौहार्द हा एकेकाळी अनेकांच्या फारच जिव्हाळ्याचा विषय होता. चित्रपटसृष्टीत अनेक मुस्लिम कलावंत हिंदू नावे धारण करुन लोकप्रिय झालेले आहेत. पडद्यावर आणि प्रत्यक्ष आयुष्यातही हे कलावंत धार्मिक कट्टरतेला रजा देऊन सर्व धर्मांचे सण साजरे करत असतं. नियतकालिकांमधील लेख, मुलाखतींमधून याचे गोडवे गायले जाण्याचा तो काळ होता. कालांतराने समाजातली आणि सिनेमातलीही ती निरागसता आता संपलेली आहे. धार्मिक कट्टरतेची कोळीष्टके अशी सहजासहजी साफ होत नाहीत हे स्पष्ट झालेले आहे. १९६२ साली प्रसिद्ध झालेला, ‘कलावंत आणि दिवाळी’ यांवरील प्रस्तुत लेख वाचताना ही निरागसता संपल्याची हूरहूर मात्र लागून राहते. मराठीत फार वापरला न जाणारा ‘अंगना’ हा शब्द ( म्हणजे सुंदर अंगे असलेली अर्थात कमनिय बांध्याची तरुणी) वाचताना थोडे अडखळल्यासारखे होईल कदाचित, मात्र हा हिंदी वळणाचा एक चांगला शब्द कळल्याचे समाधानही होईल. हा लेख लिहिला गेला त्या काळात एक मराठी पत्रकार वहिदा रहमान, माला सिन्हा आदिंशी मोकळेपणी बोलत होता याचीही कल्पना येईल.
********
मूळ शीर्षक- दीपावलींतून राष्ट्रीय तादात्म्य

दिवाळीचा तो पहिला दिवस धूमधडाका चालू होता. अन् मी ज्या इमारतीत राहातो, त्या इमारतीत तर इलेक्ट्रीक फटाक्यांच्या सरींवर सरी लावल्या जात होत्या. आधीच त्यांचा कानठळ्या बसविणारा आवाज व मधल्या चौकांत चालणारी ती आतषबाजी ह्यामुळे मूळच्या आवाजांत अनेक पटीने भर पडून जीव अगदी बेजार झाला माझा. कुठे तरी दूर, त्या आवाजापासून दूर जाण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो. पण जावे त्या बाजूला तोंच प्रकार. तेव्हा नेपियन सी रोडच्या बाजूसच थोडीफार मनःशांती लाभेल म्हणून तो रस्ता मी धरला. किती निवांत वाटत होते त्या बाजूस. रात्रीची ती शांतता पलीकडील समुद्राच्या घोंघावणाऱ्या लाटांच्या आवाजानेच काय ती अधून मधून भंग पावत होती. सारे काही कसे शांत शांत होते; एवढेच नव्हे, तर दिवाळीची चाहूलही न लागेल इतका अंधेर त्या बाजूस पसरलेला होता. रस्त्यावरील विद्युत् दीपांच्या खेरीज अन्यत्र कोठे फारसा प्रकाश दृष्टिपथांत येत नव्हता. खूप अंतर चालून गेल्यावर समुद्राच्या बाजूकडील एका इमारतीच्या वरच्या कोणत्यातरी माळ्यावरील एका ब्लॉकच्या बाल्कनींत एक युवती, अन तीही मुसलमानी पेहेरावांतली

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुराधा , चित्रपट जगत
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Shriniwas Lakhpati

      6 महिन्यांपूर्वी

    खुप-छान-माहिती ! पण त्यामानाने लेख अपूर्ण वाटला.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen