ओढा


अंक : हंस, जानेवारी १९५८

पावसाळा साधून गांवी निघालो की, गांवचा ओढा आतां भरून वहात असेल, निर्मळ धारेत बसून अंघोळ करावी.

आजारी माणसाला जशी कांहीबांही खाण्याची वासना होते, तसेच हे होते. मी कांही गांवाला फार वर्षांनी जात होतो अशांतला प्रकार नव्हता. वर्षा-दोन वर्षांनी एखादी धांवीत भेट होतेच, नाही असे नाही; पण गेल्या अनेक वर्षांत गांवच्या ओढ्यात मी अंघोळ केली नव्हती. आठवण करून पाहिले तर, काळ जवळजवळ बारा-तेरा वर्षांचा गेला आहे असे दिसून आले. निर्मळ धारेत माशासारखे पोहून जवळजवळ तप लोटले होते! गांवचा ओढा सोडला तरी या एवढ्या काळांत दुसऱ्या कुठल्याही ओढ्यात अंघोळ केल्याचे स्मरेना. इतकी वर्षे झाली, कावळ्याच्या डोळ्यासारखा स्वच्छ धारेत मी कधी पडलोच नव्हतो; झुळूझुळू वाहणारी धार पाठीपोटावरून खळाळत गेली नव्हती; चिंगळ्या माशांचे कळप अंगावरून खेळले नव्हते. वरून पाहिले तर साधी वाळू, पण पाण्यांत बुडून डोळे उघडले की वाळूचे रंगीबेरंगी खडे कसे मोठ्यामोठ्या माणिकमोत्यांसारखे दिसतात! ते धन कितीतरी दिवसांत मी पाहिलेंच नव्हते. उन्हाची तिरीप धारेवर पडल्यावर धारेच्या मध्यभागी विणली जाणारी तिपेडी-चौपेडी पाण्याची वेणी कशी रूप्यासाररखी चमकते! खूप वेळ पाण्यांत राहिल्यावर हातापायांचे तळवे कसे पांढरे-स्वच्छ, फिक्कट गुलाबी दिसूं लागतात! बोटांच्या शेवटांना सुरकुत्या पडतात, धारेंतून बाहेर काढले की, अंगावर कसे रोमांच उभे रहातात! — कितीतरी वर्षे झाली, माझे तळवे धारेने असे कधी पांढरट गुलाबी झाले नव्हते; माझ्या अंगावर कधी रोमांच उभे राहिले नव्हते!...

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , हंस
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Amol Nirban

      2 वर्षांपूर्वी

    माडगूळकर इतकं प्रत्ययकारी लिहीतात.

  2. JAYANT PRABHUNE

      2 वर्षांपूर्वी

    आम्हाला शाळेत हा धडा होता. फार सुंदर

  3. Anant Tadvalkar

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम! हे सारे म्हणजे पुन्हा एकदा प्रत्यय घेण्याचा आनंद आहे ..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen