परदेश प्रवास आणि भोजनभाऊ

पुनश्च    स. गं. मालशे    2021-01-06 06:00:02   

अंक : केसरी,  दिवाळी विशेषांक १९८२

विलायतच्या वारीच्या संदर्भात गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांची अगदी विचित्र कुचंबणा झाली. १८७३ च्या फेब्रुवारीत पार्लमेंटची फायनान्स कमिटी बसणार होती. तिच्यापुढे साक्ष देण्यासाठी विलायतेस जाण्यास तयार आहात का, अशी विचारणा लोकहितवादींना मुंबई सरकारने केली. ही विचारणा झाली त्याच्या आधीच लोकहितवादींचे चिरंजीव कृष्णराव विलायतेहून आले होते आणि प्रायश्चित्तपूर्वक पावन होईतो त्यांना काही महिने दूरही ठेवावे लागले होते, पण यात आणखीही गोम होती. विलायतेत शिक्षणासाठी निघाल्यावर बोटीतून वा नंतर आपल्या पत्रातून कृष्णराव स्वधर्मनिष्ठेची ग्वाही देत असत. उदाहरणार्थ १८६९ सालच्या जुलैमध्ये त्यांचे आपल्या आईला लिहिलेले पत्र ‘इंदुप्रकाश’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी आगबोटीवर स्नानसंध्या, गीतापाठ, भोजन वगैरे बाबतीत आपण ब्राह्मणधर्म यथासांग पाळतो, असे म्हटले होते. पण हे म्हणणे सत्यापलाप करणारे आहे, असे मत ख्रिस्ती पत्रकर्त्याने व्यक्त केले होते (ज्ञानोदय १५-७-१८६९). पुढे इंग्लंडात गेल्यावर कृष्णराव बहकले. भारतात आधीच विवाह होऊन मूल झालेले असतानाही ते एक गोरी मड्डम परत येताना घेऊन आले. मेरी कार्पेन्टरबाईंच्या मध्यस्थीने तिची सालंकृत बोळवण करावी लागली आणि पुन्हा प्रायश्चित्ताचाही जबर भुर्दंड सोसावा लागला. अशा विचित्र स्थितीत आसणाऱ्या लोकहितवादींना सरकारी विचारणा आली होती. प्रायश्चित्ताशिवाय पंक्तिपावन करून घेण्यासंबंधीच्या परिपत्रकावर पन्नास जणांच्या सह्या मिळाव्या अशी खटपट त्यानी पुण्याच्या सार्वजनिक सभेमार्फत करून पाहिली (ज्ञानोदय १-१-१८७२); पण एकूण ती यशस्वी ठरली नाही. नकार कळविताना त्यांनी सरकारला जे उत्तर दिले, त्याचा सारांश असा होता –

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


केसरी , समाजकारण
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Shriram Bhide

      3 आठवड्या पूर्वी

    आणि आज वर्तमानपत्रांतून जातपंचायतीबद्दल वृत्त जेव्हा येते तेव्हा आश्चर्य वाटतेवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.