इरावती कर्वे- भावनाशील , उत्कट आणि मनस्वी


अंकः ललित मार्च १९६९

​इरावतीबाई महाराष्ट्रात होऊन गेल्या आणि त्यांनी मराठीत लिखाण केले हे आपले भाग्य आहे ते का, याचे उत्तर या लेखात मिळेल.

साहित्यातील बाईंच्या व्यक्तित्वाला एक वेगळाच रंग आहे. १९३० साली सुशिक्षित महाराष्ट्रीय स्त्रियांची-त्यांच्यापैकी बऱ्याच विदुषी झाल्या-एक पिढी बाहेर आली. बहुतेकींच्या मनांनी स्त्री-स्वातंत्र्य अन् अधिकार यांच्या ध्येयवादाने उलटे-सुलटे गोते आणि हेलकावे खाल्ले. काहींच्या मनाला त्यामुळे वेडेवाकडे तडेही गेले. बाई मात्र प्रथमपासूनच म्हणत गेल्या, - “बायांनो, अग पुरुषांशी समान हक्कासाठी, बरोबरीने काय भांडता? नेहमी जास्त हक्कांसाठी भांडत जा!” या त्यांच्या बोलण्यात हक्क आणि अधिकार यांच्यापलीकडे जाणाऱ्या स्त्री-पुरुष संबंधातील अनेक पर्यायांच्या आणि गुंतागुंतीच्या भावबंधांची एक सूक्ष्म, प्रगल्भ आणि खोल जाणीव आहे. ज्ञानाची, संशोधनाची क्षितिजे पाहता पहाता, महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही बाई कीर्तीमान होत गेल्या. पण स्त्रीत्वाच्या ऋजुतेच्या, खोल शहाणपणाच्या त्यांच्या नितळ जाणीवा कधी हादरल्या नाहीत. वाढत्या वयाबरोबर अभंग अन् अधिकाधिकच टवटवीत राहिल्या. नंद्या कर्व्याची आई हे शब्द ऐकताच आलेली परिपूर्तीची धन्यता, पुरुषाच्या कणखर आवाजाच्या अभावी घराला आलेले मलूल सुनेपण, उत्खननात सापडलेल्या स्त्रीचा सांगाडा पाहून सनातन स्त्रीच्या सखीपणाचा झालेला साक्षात्कार, आजच्या उद्योगप्रधान समाजाच्या भोवऱ्यासारख्या गतिमानतेत लहान लहान स्थिर कणाचा आळीतल्या वर्षानुवर्षांच्या भाजी-वालीसारख्या मनाला वाटणारा आधार-‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ यांमध्ये आलेल्या बाईंच्या भावविश्र्वातील ‘थीम्स’मध्ये याच जाणीवा व्यक्त झाल्या आहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित , स्त्रीविशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.