कथा :किल्ला

पुनश्च    वि. स. खांडेकर    2021-01-20 12:00:00   

अंक –अलका, ऑगस्ट, १९५९

समुद्रकिनाऱ्याच्या पलिकडेच ती सुंदर टेकडी होती. एखाद्या देवळापुढल्या तळीजवळ दीपमाळ असावी तशी!

त्या टेकडीवर एका दिग्विजयी राजाने आपला दुर्गम किल्ला बांधायला प्रारंभ केला. त्या किल्ल्यावरून समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूची टेहळणी तो करणारा होता. त्या किल्ल्यांतल्या पश्र्चिमेकडली रंगमहालांत आपल्या आवडत्या मद्याचे घोट आणि आपल्या आवडत्या अप्सरेचीं चुंबने घेतां घेतां मावळतीकडे संध्याकाळी नृत्य करणाऱ्या रंगछटा तो पहाणार होता. शरद ऋतूंतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं क स्वप्न रंगविणार होता. आपला किल्ला हे एक जहाज आहे, ते जहाज चांदण्याच्या समुद्रांत प्रवास करती चालले आहे, त्या जहाजाचे कर्णधार आपण आहोत. चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , अलका
कथा

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    लघुकथा खरच विचार करायला लावणारी आहे.

  2. Prakash Khanzode

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर सादरीकरण, contemporary and still colloquial!

  3. Sandhya Limaye

      4 वर्षांपूर्वी

    कथा आवडली

  4. Sandhya Limaye

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर लघुकथा

  5. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    आशयघन, अंतर्मुख करणारी कथा!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen