घटका गेली पळें गेलीं

पुनश्च    जयवंत दळवी    2021-01-23 06:00:01   

अंक : ललित, जुलै १९६९

लेखाबद्दल थोडेसे : ठणठणपाळांचा हातोडा साहित्यविश्वावर ठाण् ठाण् बरसत असे. परंतु क्वचित तो हळवा होऊन साहित्यातील नररत्नांसाठी आपल्या खास शैलीत अश्रूही ढाळत असे. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर ठणठणपाळ उर्फ जयवंत दळवी यांनी ललितमध्ये लिहिलेला हा लेख. एका शब्दप्रभूने दुसऱ्या अफाट साहित्यिकाला वाहिलेली ही नितांत सुंदर आदरांजली..... ५१ वर्षांपूर्वींंचा हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

आचार्य प्रल्हाद केशव अत्र यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राला दु:खाचा जेवढा प्रचंड हादरा बसला तेवढा गेल्या कित्येक वर्षांत बसला नसेल. अनेक मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करताना ‘निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही’ असे सरधोपटपणे म्हटले जाते. प्रत्यक्षात ‘निर्माण झालेली पोकळी’ कुणाला जाणवत नाही. परंतु पोकळी निर्माण होणे म्हणजे काय हे फक्त आचार्य अत्र्यांच्या निधनामुळेच सर्वांच्या लक्षात येईल यात कसलीच शंका नाही. कारण आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती. आणि हा स्पर्श करण्याची त्यांची रीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की, ती यापूर्वी कुणाला साधली नाही, यापुढे कोणाला साधेल अशी शक्यता नाही.

********

 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , मृत्यूलेख
मृत्यू लेख

प्रतिक्रिया

  1. Hrushikesh Jagannath Mirgal

      11 महिन्यांपूर्वी

    आज आचार्य अत्रे हवे होते. त्यांच्या तिरकस आणि तिखट लेखनामुळे आजचे राजकीय नेते आणि मतदार सरळ झाले असते.

  2. Shriniwas Lakhpati

      4 वर्षांपूर्वी

    आचार्य-अत्रे म्हणजे अफाट-अचाट माणूस ! हा लेख 1969 सालचा म्हणजेच आजपासून सुमारे 52 वर्षापूर्वीचा आहे. आणि अत्र्यांच्या निधनानंतर 3 वर्षांनी -- 1972 चा माझा जन्म आहे. पण तरीदेखील हा लेख काल-परवाचा वाटतो आहे. ह्यावरुनच ह्या महाराष्ट्रावर आणि माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यावर किती जबरदस्त गारुड आहे हे लक्षात येतं. माझ्या वडिलांचे आचार्य-अत्रे म्हणजे परमदैवत होते. त्यांच्याकडून आचार्य-अत्र्यांचे अनेक किस्से ऐकतच आम्ही भावंडं लहानाची मोठी झालो. आणि "आज सभोवताली जी काही परिस्थिती आपण बघतो ती पाहताना ह्या सगळ्यावर भाष्य करायला आज आचार्य-अत्रे हवे होते !" असं मला मनापासून आणि सातत्यानं वाटतं. त्यांच्याबद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर "असा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. आणि ह्यापुढेही दहा हजार वर्षात होणार नाही ! विनम्र-अभिवादन ! -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

  3.   4 वर्षांपूर्वी

    खुप छान..

  4. JAYANT PRABHUNE

      4 वर्षांपूर्वी

    मस्त लिहिलय



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen