भारतीय विद्याभवनप्रणीत मराठा वर्चस्व


अंक : नवभारत, जून १९७९

लेखाबद्दल थोडेसे : भारतीय विद्या भवन ही कन्हैयालाल मुन्शी यांनी १९३८ साली स्थापन केलेली संस्था. शिक्षण, संशोधन संस्कृतीवर्धन या क्षेत्रात संस्थेचे काम मोठे आहे. परंतु भारताच्या इतिहासाचे खंड प्रसिद्ध करताना त्या त्या प्रदेशातील संशोधकांशी चर्चा करुन निष्कर्ष काढण्या ऐवजी 'दुरून दिसले ते लिहिले' अशा पद्धतीने मराठ्याचा इतिहास विद्याभवनाने प्रसिद्ध केेलेल्या खंडात लिहिला गेला. त्याचा अतिशय तिखट भाषेत नी. र. वऱ्हाडपांडे यांनी या लेखात समाचार घेतला आहे. नी. र. वऱ्हाडपांडे  हे मराठीतील ज्येष्ठ तत्त्वचिंतक. भाषेच्या अभ्यासात त्यांच्या शब्दाला विलक्षण मान होता, मनोविज्ञानातील त्यांचे दाखले बिनतोड असायचे.  प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्यासोबतची त्यांची चर्चा खूप गाजली होती. ज्ञानक्षेत्रातील ते एक तपस्वी होते. कुणी त्यांना ‘विवेकविभूषण’ म्हणायचे. कुणी त्यांना ‘काव्यतीर्थ’ म्हणूनही ओळखायचे. संस्कृतचा  त्यांचा गाढा अभ्यास होता. मराठी आणि इंग्रजीतील त्यांची भाषणे तृप्ततेची अनुभूती देणारी असायची. २०१५ साली वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी १९७९ साली लिहिलेला हा लेख वाचताना त्यांच्या संशोधनाची, अधिकाराची झलक दिसते. 

********

भारतीय विद्याभवनाने मराठा वर्चस्व-मराठा सुप्रीमसी – या नावाखाली प्रकाशित केलेल्या या खंडाने भारताचा इतिहास निवेदन करण्याची भवनाची योजना सिद्धीस गेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर लिहिल्या गेलेल्या भारताच्या इतिहासात मराठा कालखंडाला एक स्वतंत्र खंड देण्याची पद्धत नसते. मुघल साम्राज्याचा ऱ्हास या नावाखाली मराठ्यांच्या इतिहासाची साधारणपणे बोळवण करण्यात येते. वस्तुतः बाबर ते औरंगजेब या कालखंडापेक्षा शिवाजी महाराज ते दुसरा बाजीराव हा कालखंड फारसा लहान नाही. मुघल हे भारतात साधारणपणे शंभर वर्षे प्रमुख सत्ता या नात्याने नांदले. मराठेही साधारणपणे तेवढाच काळ भारतात सर्वप्रबल होते. असे असूनदेखील भारताच्या इतिहासात मराठ्यांचा वृत्तान्त साधारणपणे चार-दोन पृष्ठांत उरकण्यात येतो. याचा परिणाम असा झाला आहे, की भारतात कधीकाळी मराठ्याचे राज्य होते एवढेच नव्हे, तर भारताचे राज्य इंग्रजांनी मराठ्यांकडून घेतले; मुघलांकडून नव्हे हे, महाराष्ट्राच्या बाहेर, सुशिक्षितास देखील क्वचितच माहीत असते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , नवभारत
इतिहास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.