अंक :लोकप्रभा, २८ जानेवारी १९९४
हे थोडे ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ असे झाले आहे खरे, पण हे तुला उपयोगी पडेल असा विश्र्वास. अनेक पदार्थ सांगायचे राहून गेले आहेत— त्यासंबंधी पुन्ही लिहीन. पण आता तू निदान ‘स्वयंपाक कॉन्शस’ तरी होशील आणि स्वयंपाकघराचे व्यक्तिमत्व आणि महत्त्व तुझ्या मनात भरेल असे वाटते. आता तुला आमटी, भात, भाजी, चपाती एवढे तरी नक्की करता येईल आणि सकrळी पाव आणि जाम, दुपारी जाम आणि पाव आणि रात्री मात्र डबलडेकर जामलेला पाव या कोंडीतून तू सुटशील. याचबरोबर भुकेचे आणि तिच्याबरोबर उपासाचेही जीवनातील स्थान तुझ्या लक्षात येईल. कवीने म्हटलेच आहे—
भुकेसारखा या जगी शत्रू नाही
भुकेसारखा अन्य नाही गुरुही
म्हणूनी स्वयंपाक जाणून घ्यावा
उपासासही आपुलासा करावा!
शेवटी स्वसंरक्षणार्थथ एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुला सांगून ठेवतो. तू स्वयंपाकघरात पारंगत होशील यात शंका नाही. ही एक अनुवांशिक गोष्टही असेल! पण तुला चांगला स्वयंपाक येतो हे तुझ्या भावी वधूला कळू देऊ नकोस. नाही तर स्वयंपाक कायमचा तुझ्या गळ्यात पडेल आणि तुझ्या मुलांसाठी तू अशाच रेसिप्या पोटतिडिकेने लिहीत बसशील!
लेखक : शंकर वैद्य
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Anant Tadvalkar
4 वर्षांपूर्वीशंकर वैद्य यांच्या कविता ऐकल्या होत्या .त्यांचा साहित्याचा अभ्यास ठावूक होता .पण पाककला हादेखील त्यांचा विषय आहे हे ठाऊक नव्हते.. छान लेखन आणि समजावून सांगण्याची पद्धत सुद्धा उत्तम.
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख