कारखान्यांतून संशोधन करताना

पुनश्च    माणिक खेर    2021-02-03 06:00:02   

अंक : अंतर्नाद, जुलै २००७

लेखिका : माणिक खेर

मी संशोधक झाले ते अगदी मुद्दाम ठरवून. नाइलाजाने किंवा अपघाताने नव्हे. त्यामुळे ‘‘हिला एम.ए. करताना कोणी भेटला नाही, म्हणून आता पीएच.डी. करायला आली आहे’’ अशी माझ्या वडिलांच्या परममित्रांनी माझी भलावण केली, तेव्हा एकंदरीतच महिला संशोधकांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असतो, हे मी ताडले.

संशोधनावर टीका ऐकण्याआधी संशोधन करण्यावरच टीका ऐकवत अनेक ‘आरामखुर्चीतल्या’ टीकाकारांनी मला संशोधन कसे करू नये, याचे धडे दिलेले आहेत!

‘‘संशोधनात काय मोठ्ठंसं, दहा पुस्तकं वाचून एक लिहायचं!’’ ‘‘संशोधन म्हणजे शेवट उघडा ठेवण्याची प्रक्रिया (म्हणजे कधीच न संपणारे, ते संशोधन, असा आडून मारलेला टोला!) इ. इ. ही टीकाकार मंडळी मला सुनावत. त्यांचे टोले हसत हसत परतवताना माझी विनोदबुद्धी जागरूक केल्याबद्दल मनोमन मी त्यांचे मानत असे!

पाव शतकापूर्वी मी औद्योगिक संबंधावर संशोधन करू लागले, तेव्हा अशा प्रकारे संशोधन करण्यासाठी मुलीच काय, पण मुलेही क्वचितच प्रत्यक्ष कारखान्यात जात. मुंबईतल्या कारखान्यांत फील्डवर्क करणाऱ्यांची संख्या थोडी-बहुत असायची. पण निव्वळ संशोधनासाठी जाणारे फारच थोडे. पुण्या-मुंबईतल्या कारखान्यांबद्दल निदान काही वाचायला तरी मिळते; पण लहान गावातल्या कारखान्यांची काहीच माहिती मिळत नाही, या भूमिकेतून मी प्रथम कोल्हापूर, इचलकरंजी, हरिहर या गावांतील कारखान्यांतून संशोधनासाठी परवानगी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिथेच काय, खुद्द पुण्यातही डाळ न शिजल्यामुळे मला मुंबईला जावे लागले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , अनुभवकथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    agdi perfect observation !

  2. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत माहितीपूर्ण लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen