उत्साहवर्धक वाङ्मय

पुनश्च    अज्ञात    2021-02-13 06:00:02   

अंक – किर्लोस्कर मासिक – ऑगस्ट १९३१

मनुष्याचे मन नेहेमीच उमेदीत नसते. अडचणी नसतांनाही कित्येक वेळा आपली मनोवृत्ति कंटाळलेली, उत्साहशून्य झालेली असते. अडचणी असल्या म्हणजे गोष्ट सांगावयास नको. आपण श्रमून घरी आलो म्हणजे हुषारी येण्यासाठी चहा, दूध घेतो. त्याप्रमाणेच मनाची अप्रसन्न स्थिति घालविण्यास उत्साहवर्धक वाङ्मयासारखे दूध नाही. नुसता उत्साह अंगात संचारून भागत नाही. कार्याची दिशा कळावी लागते. त्यांत अडचणी काय येतील ते आगाऊ समजावे लागते. या सर्व गोष्टींचा ज्या वाङ्मयांत उहापोह केलेला असेल ते वाङ्मय राष्ट्रांत जितके निघेल त्या प्रमाणाने तरुणपिढीचा उत्कर्ष होतो. म्हणून उत्साहवर्धक वाङ्मय तयार करणे व त्याचा प्रसार करणे ही एक राष्ट्रीय कामगिरीच आहे. तरुणपिढीला कार्यतत्पर करणे यापेक्षां पराक्रम कोणता? आपला चरित्रसंग्रह वाचून नेपोलियनची व तत्सम इतर वीरपुरुषांची महत्त्वाकांक्षा जागृत होणार आहे असे प्लूटार्कला आगाऊ कळते तर त्याला केवढी धन्यता वाटली असती?

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Milind Kolatkar

      4 वर्षांपूर्वी

    आज, कमाल गेल्या वीस वर्षांतल्या पुस्तकांचा विचार केला तर कोणती पुस्तकं सुचुव शकाल? लगेचच दोन नक्कीच समोर येतात: विश्वास नांगरे पाटील , २०१६. मन में है विश्वास. राजहंस, पुणे. २५०/- आणि शशिकांत पित्रे, (मेजर जनरल (निवृत्त)) , २०००. या सम हा : अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्वाची लोकविलक्षण यशोगाथा!, vol.२०००. राजहंस, पुणे. २०२० ४००/-

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    कोणत्याही कालखंडात हा लेख उपयुक्त आहे

  3. Prashant Chaudhari

      4 वर्षांपूर्वी

    होतील

  4. Prashant Chaudhari

      4 वर्षांपूर्वी

    या लेखात उल्लेखलेली पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध होरील का?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen