एक तत्त्वज्ञानी कुबेर


अंक – किर्लोस्कर मासिक – दिवाळी अंक – नोव्हेंबर १९३१

एखाद्याचे नशीब त्याला कुठे कसे घेऊन जाते हा दैवाचा अजब खेळ आहे. राजस्थानातून एक मुलगा दत्तक म्हणून अंमळनेरला येतो आणि पुढे सूतगिरणी उभारतो त्याची ही कथा जवळपास ९० वर्षे जुनी आहे.  श्रीमंत प्रतापशेट यांचा या लेखात मांडलेला आर्थिक,  वैचारिक प्रवास मनाला उभारी देणारा आहे. यशस्वी व्यक्तींच्या कथा नेहमीच आपल्यालाही नकळत पुढे घेऊन जातात.

..********

खरा तत्त्वज्ञानी कर्तृत्वशून्य नसून कर्तबगार असतो हे सिद्ध करणारे प्रताप मिल्सचे संस्थापक श्रीमंत प्रतापशेटअंमळनेरयांचे स्फूर्तिदायक चरित्र.

पैसा हे साध्य नसून साधन आहे, केवळ श्रीमंतीच्या जोरावर मानवी जीवनाची सफलता होणे शक्य नाही, विद्येपासून होणारा आनंद हाच सर्वश्रेष्ठ आहे, अशीच शेटजींची विचारसरणी आहे व विचार आणि आचार यांच्यामधील संवादित्व हाच शेटजींच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण आहे.शेटजींच्या जीवनसरितेचा ओघ, प्रेमळ मैत्रिणीप्रमाणे एकमेकीना अलिंगून जातानादेखील स्वतःचे व्यक्तित्व न गमावणाऱ्या गंगा-यमुनांच्या सात्विक संगमाप्रमाणे भासतो. व्यवहार आणि तत्त्वज्ञान या दोन सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने परस्परविरोधी भासणाऱ्या गोष्टींची बेमालुम सांगड घालून आपल्या मानसिक बलाच्या प्रभावाने या दोन्ही एकमेकीस अपकारक न होता पोषकच कशा होतील याची त्यांनी दक्षता घेतली आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    1931 या काळाला अनुरूप असा माहितीपूर्ण आणि प्रशंसापात्र, उद्योगजकाविषयीचा लेख. 1991 नंतरच्या जागतिकेकारणांनारच्या काळात त्याचे तेव्हडेच महत्व राहील याची शंका वाटते!

  2. Mohan Chavan

      4 वर्षांपूर्वी

    धन्यवाद नारायणजी.... श्रीमंत प्रताप शेठ यांच्या वरील लेखामुळे त्यांच्याविषयीची बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यांच्या नावाच्या प्रताप विद्या मंदिर चोपडा,प्रताप कॉलेज अमळनेर या ठिकाणी शिक्षण घेऊनही मला त्यांच्याबद्दल खूपच कमी माहिती होती. माझ्या गावाजवळ असलेल्या उनपदेव तीर्थक्षेत्री ही त्यांनी धर्मशाळा बांधून ठेवलेली आहे. शेठजींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन व आपल्या लेखनालाही सलाम...

  3. Mohan Chavan

      4 वर्षांपूर्वी

    धन्यवाद नारायणजी.... श्रीमंत प्रताप शेठ यांच्या वरील लेखामुळे त्यांच्याविषयीची बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यांच्या नावाच्या प्रताप विद्या मंदिर चोपडा,प्रताप कॉलेज अमळनेर या ठिकाणी शिक्षण घेऊनही मला त्यांच्याबद्दल खूपच कमी माहिती होती. माझ्या गावाजवळ असलेल्या उनपदेव तीर्थक्षेत्री ही त्यांनी धर्मशाळा बांधून ठेवलेली आहे. शेठजींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन व आपल्या लेखनालाही सलाम...

  4. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खूपच प्रोत्साहित करणारे लिखाण केले आहे

  5. Mahesh Pokharanakar

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen