अंक – सत्यकथा, ऑगस्ट, १९७६
लेखक – पु. ल. देशपांडे
(पु. ल. देशपांडे यांनी खानोलकर यांच्यावर लिहिलेला लेख. २६ एप्रिल १९७६ रोजी त्यांचे निधन झाल्यावर सत्यकथेनं हा विशेषांक काढला होता.)
‘आणि आकाशाकडे तोंड करून त्याने गर्जना केली, बाप्पा, तुला क्षमा नाही. वाड्यावरचे लोक दोंदे वाढवतात. माझ्या काश्याचे पाय लंगडे होतात आणि मोगरा मात्र फुलतच राहतो.’
‘चाफा’
....असे वाटते की खानोलकरवर काही लिहू नये. त्याच्या पुस्तकांतून जो खानोलकर आता हाती उरला आहे त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकांतून त्यालाच बोलू द्यावे. त्याचेच ऐकत राहावे. त्याच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे की नाही ते अजमावीत राहावे. श्वास कोंडायला लागला तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा. चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी ह्या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले-कळलेसे वाटणारे बोलला काय आणि कळण्या-न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता तिथे निघूनही गेला काय! त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत. वयाच्या वडिलकीमुळे की आणखी कशामुळे कोण जाणे, खानोलकर भेटला की किंचीत संकोचाने वागायचा. पत्रांतून आदर वगैरे व्यक्त करायचा. त्याचे ‘अवध्य’ नाटक पुण्यात पाहिल्यावर मी त्याला घरी घेऊन आलो. सकाळचा प्रयोग होता. अचानक थिएटरात भेटला. शाळेतले शिक्षक फळ्यावरचे लिहून झाले की मुलांकडे चष्म्याच्या फ्रेमच्या वरच्या काडीवरून बघतात तसे बघायची त्याला सवय होती. तोंडात नेहमीप्रमाणे भरपूर पान भरून रंगलेले होते. कोकणीत ‘मुमुरकेंशे’ म्हणतात तसे बिनआवाजी हसण्याची त्याची लकब असे. वयाचा मान राखल्यासारखा समोर आला. मी म्हणालो—नाटक संपल्यावर घरी चल. नाटक संपले. आणि नाटकातल्या बऱ्या-वाइटाची चर्चा करीत घरी आलो. दुपारी एक-दीडच्या सुमाराला. संध्याकाळी पाचसहा वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. आणि आश्चर्य असे की खानोलकरच बोलत होता. इतके दीर्घ आणि मनातले काही सांगावे अशा तळमळीने त्याच्याशी झालेले तेवढेच माझे बोलणे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शुभदा चौकर
4 वर्षांपूर्वीयोग्य वेळी हा लेख वाचायला मिळाला। एखाद्या प्रतिभावान व्यक्तीची प्रतिमा मनात ठसते ती त्याच्या साहित्यकृतीमुळे आणि अंगभूत चांगुलपणामुळे। तिला धक्का लावणारे किस्से वाचनात आले की मन खंतावते। नको होते ते हाती पडायला, असे काहीसे वाटते। त्यावर उतारा म्हणजे हा लेख! -त्या साहित्यिकाचे प्रांजळ शब्दचित्र उमदेपणाने पुन्हा मनात रुजवणारे!! -शुभदा चौकर
Tanaji Gaikwad
4 वर्षांपूर्वीछान आहे
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख