खानोलकरचे देणे - भाग २


अंक – सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

“सुइणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.”

ह्या दोन ओळींत नव सर्जनाला आवश्यक असणारी निसर्गानेच निर्माण केलेली अपरिहार्य निर्घृणता त्याला दिसली आहे. त्याचे हे ‘पाहणे’च असे लोकविलक्षण. म्हणूनच त्याच्या वाणीतून एक अनोळखी कविता फुलत गेली. पूर्वसूरींचा एखाद सूर उमटला असलाच तर तो अपवाद म्हणून. त्याच्या कथाकादंबऱ्यांतून सर्वार्थाने अभूतपूर्व अशी माणसे आपल्याला भेटत गेली. ‘तो कुणी माझ्यांतला तो घनतमीं तेजाळतो’ असे त्यानेच म्हटले आहे. तो ‘केशरी अग्निज्वाळेपरी नग्न आहे’. ह्या अलौकिक ‘निराळ्या’ची ही सारी निर्मिती. व्यवहारात जगताना खानोलकरच्या वाटेत तो यायचा. चकव्यासारखा त्याला भलत्याच वाटेने न्यायचा. तिथून मग खानोलकरचे लौकिक वागणे-चालणे डोळे बांधलेल्या माणसाचे व्हायचे. संभावितांना त्यायचे धक्के लागायचे. चिंतू खाणावळ्याला आरती प्रभूचे शाप बाधायचे. त्याच्या कवितेतल्या त्या चिमणीसारखा, ‘गॅलरीतला क्षणापूर्वीचा उन्हाचा चौकन शोधताना’ तो हरवून जायचा. त्या हरवलेपणातली त्तयाची ती असहाय्य चिवचिव कविता होऊन यायचीः

“अर्थ चिमणे चिमणे : शब्द मादी
बोले... मिनिटां मिनिटां विसंवादी”

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सत्यकथा , मृत्यूलेख
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 आठवड्या पूर्वी

    पु ल देशपांडे यांनी खानोलकरांविषयी लिहिलेले दोन्ही लेख वाचले .यापूर्वी हृदयनाथ मंगेशकरांचा खानोलकरां विषयीचा लेख देखील वाचला . लोकसत्तामधील सुभाष अवचट यांनी लिहिलेला लेखही वाचला . त्यानंतर खानोलकरांच्या कन्येने लिहिलेली पोस्ट देखील वाचण्यात आली . हे सगळं वाचल्या नंतर मनाला हुरहूर वाटून जाते कि एक चांगला प्रतिभासंपन्न कवी लेखक त्यांच्या समकालीन कलावंतांना जाणून घेता आला नाही . खानोलकरांना समजून घ्यायला थोडा उशीरच केला असावा . एवढा प्रतिभासंपन्न कवी ऐहिक जीवनातील समस्या प्रश्न यांनी गांजून जायला नको होता .याबाबत इतरांनी त्यांना आधार दिला असता तर मराठी साहित्य मध्ये मोलाची भर पडली असती . असो . त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत कोंडुरा अगोचर गणूराया आणि चानी . चानी कादंबरी वाचल्यानंतर मी खूप वेळ रडत होतो त्याचं स्पष्टीकरण मला देता येणार नाही .त्यांच्या काही कविता खूप आवडीचा आहेत . त्यांच्या गाण्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या चाली आजही ऐकावेसे वाटतात . आपण खूप छान लेख उपलब्ध करून दिले धन्यवाद .वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.