शिवाजीमहाराजांचे कार्य-कौशल्य

पुनश्च    ग. ह. खरे    2021-02-20 06:00:00   

अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१

लेखक – श्री. ग. ह. खरे

इसवी सनाच्या १७व्या शतकांत महाराष्ट्रामध्ये असा एक महापुरुष होऊन गेला की, त्याचे स्मरण, त्याची आठवण, तत्कालीन लोकांना होत असेच. पण पारतंत्र्यांत खितपत पडलेल्या विसाव्या शतकांतील मराठी भाषिकांनाच नव्हे तर भारतांतील स्वातंत्र्येच्छु इतर लोकांनाही ती होत असे व आज स्वराज्य झाल्यावरही तितक्याच प्रकर्षाने होत आहे.

जगामध्ये स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक महापुरुष होऊन गेले. केवळ पराक्रमाचाच विचार केला तर, कदाचित् ज्यांनी शिवाजीमहाराजांहून अधिक पराक्रम दाखविला असे पुरुष होऊन गेले असतील; किंवा एकेका गुणाच्या बाबतींत शिवाजीमहाराजांशी तुलना केली तर सरस ठरतील असेही पुरुष इतिहासांत आढळतील. तथापी, श्रीशिवाजीमहाराजांचे ठायी जो गुणसमुच्चय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केले त्याप्रमाणे कार्य करणारा आणि असा अलौकिक गुणसमुच्चय असणारा श्रीशिवाजीमहाराजांहून निराळा मनुष्य असेल असे वाटत नाही. तथापी, गुणांचा आणि कार्याचा हा प्रकर्ष त्यांच्या ठिकाणी एकदम अवतारीत झाला असे म्हणतां यावयाचे नाही. अर्थात ते जन्मतःच अवतारी पुरुष होते असे म्हणणे कठीण आहे. हे सर्व जरी खरे असले तरी केवळ त्यांचे अगदी पहिले पत्र पाहिले आणि त्यावर उठविलेली त्यांची ‘प्रतिपश्चंद्ररेखेव’ ही मुद्रा पाहिली म्हणजे या पुरुषाच्या ठिकाणी सामान्य माणसापेक्षा कांही तरी अधिक होते...वेगळी विचारसरणी होती...विशेष ध्येय होते...असे वाटूं लागते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , श्रीसरस्वती , श्रीशिवराज विशेषांक
इतिहास

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      10 महिन्यांपूर्वी

    नवीन माहिती मिळाली . छान . उपयुक्त लेख जय शिवराय

  2. Mahesh Pokharanakar

      10 महिन्यांपूर्वी

    अुपयुक्त अितिहास.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen