चिमण्या


अंक : वाङ्मय शोभा  दिवाळी १९६० लेखक:  मधु मंगेश कर्णिक   सकाळी आमच्या आधीच चिमण्या जाग्या होतात. घराच्या उघड्या खिडक्यांतून त्या आत घुसतात. दांडीवर बसून त्यांची गाणी सुरू होतात. प्रथम एखादीच चिमणी गात असते. तिचे गाणे दुसऱ्या चिमणीला आवडत नाही. ती येते नि आपल्या पद्धतीने निराळ्या सुरांत गाऊं लागते. बाहेर असणाऱ्या बाकीच्या चिमण्यांना ती दोन्ही गाणी पसंत पडत नाहीत, नि त्या सगळ्या एकमेळानं आंत येतात; दांडीवर बसतात. न सगळ्याजणी एकदम गाणी म्हणायला सुरुवात करतात. झोपाळ्यावर बसून मुली जशा एका सुरांत गाणी म्हणतात तशी-प्रथम गाणाऱ्या त्या चिमण्यांना मग जोर चढतो; त्या जोरजोराने ओरडू लागतात, नि मग हां हां म्हणतां दांडीवर झोंके घेणारी ती मैफल पंख फडफडवीत इतस्ततः विखुरली जाते. क्षणार्धात शंभर शिट्या एकदम वाजवाव्या तसा कल्लोळ सुरू होतो. आवाज चढविण्याची शर्यत लागते, नि घरांत झोंपलेली सारी माणसें जागी होतात. कुणीतरी धुणी वाळत घालायची काठी हातात घेऊन चिमण्यांना हुसकून लावते. घरधनीण स्टोव्हला पिन् करतां करतां म्हणते – ‘सटव्यांनी जीव खाल्ला नुसता! उजाडते नाही तो झाला यांचा गर्गशा सुरू-’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वाड्मयशोभा , ललित
ललित

प्रतिक्रिया

  1. Amol Suryawanshi

      8 महिन्यांपूर्वी

    अतिशय सुंदर व भावुक

  2. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खुपच प्रत्ययकारी लेख आहे . मी खेडेगावात रहात असल्यामूळे मला ही लिमण्यांचा असा अनुभव येतो . आमच्या घरात चिमण्यांनी मागे घरटे करून पिले जन्माला घातली . पण त्यामुळे घरातील सर्वांची चिडचिड वाढली . लेखकाने मात्र खूपच अभ्यासपूर्ण लिहिले आहे :



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen