नववधूची मानहानी

पुनश्च    कुन्दा मोडक    2021-03-20 06:00:02   

अंक : किर्लोस्कर मासिक - जानेवारी १९७९

तिच्या मानभंगाचा पहिला प्रसंग म्हणजे वधुपरीक्षा. वराकडील मंडळी एखाद्या बॉसप्रमाणे तिची ‘मुलाखत’ घेतात. अनेकदा समाधानकारक प्रश्नही विचारतात. वधुपरीक्षेची भैरवी वराकडील मोठ्या मंडळींना मुलीनं वाकून नमस्कार करून होते. हल्लीच्या शिकलेल्या मुलींना हे प्रत्येकासमोर वाकून नमस्कार करणं बिलकूल पसंत नसतं. वधूनं जर ‘वरा’ची अशीच मुलाखत घ्यायचं ठरविलं तर मात्र मुलाकडच्या माणसांना ती मानहानी वाटते.

मुलगी दाखविण्याच्या पहिल्या क्षणापासूनच वधुपक्ष लाचार व वरपक्ष शिरजोर ही भावना आपोआपच रुजते.

वास्तविक विवाहसमारंभ म्हणजे दोन घराण्यांचे स्नेहसंमेलन असं सुंदर स्वरूप असायला हवं, पण त्या दिवशी प्रत्येक विधी असतो तोच मुळी वरपक्षाचा वरचष्मा मान्य करणारा व पोसणारा!

सुशिक्षित मुलीची मानहानी करणाऱ्या विवाहसमारंभातील काही विधींचं उच्चाटणच केलं पाहिजे-

त्यापैकी पहिला विधी म्हणजे विहिणींचे पाय धुणं. तिला चौरंगावर बसवून तिचे तस्तामध्ये गरम पाण्यानं पाय धुतात. त्यावर हळदीकुंकवाची स्वस्तिकं रेखतात व तिची ओटी भरतात. तिचा मानपान झाला की तिच्या बहिणी, जावा, भावजया, नणंदा वगैरे समस्त स्त्री-परिवाराचा असाच सन्मान केला जातो. वरपक्षाकडच्या लहान मुलामुलींचे सुद्धा पाय धुवायला लावतात.

विहिणींची ओटी भरण्यात आक्षेपार्ह काही नाही असं मानता येईल. पण तिचे व तिच्या परिवाराचे पाय धुणं म्हणजे तिचं श्रेष्ठत्व मानणं व जोपासणं नव्हे काय?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर , स्त्री विशेष
स्त्रीविशेष

प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    nice article. But not seen in big cities, but very much present in smaller towns & villages

  2. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    आताची लग्न बघायला हवीत लेखिकेने। मुली मिळणे च इतके अवघड झालंय की वधू माय आता हे सगळे पूर्वीसारखे माझे लाड करा म्हणून हट्ट करेल

  3. Nitin Dhage

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख

  4. JAYANT PRABHUNE

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान विचार आहेत



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen