-आणि तिसरा दिवस उजाडला. शाळा बंदच होती. मरगळल्यासारखे वाटत होते. घरातील माणसे कसल्यातरी काळजीत होती. त्यांच्या हालचाली आखडल्यासारख्या होत होत्या. कोणीच कोणाशी धड बोलत नव्हते.. हे चालले आहे तरी काय! आम्ही किलकिल्या नजरेने सगळे पाहत होतो. एखाद्या क्षणी याचे दडपण येत होते. एखाद्या क्षणी गप्पांत त्याचा विसर पडत होता. जेवणे झाली. आपापल्या ठिकाणी बसलो....नेहमीसारखीच शांत दुपार. आता काही वेळाने चहा होईल.... पुन्हा घर हालू लागेल.... चहाची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात काही माणसांचा एक घोळका फाटकातून आत घुसला! डोळे वटारलेली, केस पिंजारलेली माणसे. आमचे घर जाळण्याच्या बेताने आली होती-कारण महात्मा गांधींचा खुनी आमच्या जातीचा होता....कोणीतरी घराचे पुढचे दार लावून घेतले. आत काळोख झाला. दबलेल्या आवाजात आम्हांला इशारा मिळाला, "तुम्ही वर जा." आम्ही वर पळालो. दाराला धक्के बसत होते. दार फोडल्याचा आवाज ऐकू येत होता....आम्ही भेदरलो होतो; पण कुतूहल होतेच. माडीवरच्या खिडकी तून खाली डोकावून पाहत होतो... जमाव वाढला होता. पहारीने दार फोडले जात होते. शेवटी ते दार उन्मळून खाली पडले आणि माणसे आत घुसली. जिकडेतिकडे फिरू लागली. जे जे मिळेल ते ते त्यांनी उचलले व घरासमोरच्या रिकाम्या जागेत त्या सामानाचा दीग केला.-आम्हांला आत खेचले गेले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dipak Moghe
11 महिन्यांपूर्वीलेख प्रसंगिक होता. खूप छान.
Geetanjali Joshi
4 वर्षांपूर्वीलेख मनाला स्पर्श करून गेला.