महात्मा गांधींची प्रतिमा माझ्या मनात विदेही स्वरूपानं आहे. छायाचित्र, चित्र, पुतळे, फारतर महात्मा गांधी असे दिसायचे एवढंच मला सांगू शकतील. पण 'सुंदर विचार' हा फुलपाखरं किंवा पारा याप्रमाणंच चिमटीत येण्यास अवघड. दारांभितींवर सुभाषितांच्या सुबक पट्ट्या लावणं सोपं आहे, पण त्या सुभाषितांचं आव्हान स्वीकारायचं झालं तर मी फार खुजा ठरेन. आणि मला वाटतं, माझ्याप्रमाणंच माझ्या प्रकृतीची अनेक माणसं त्या आव्हानाप्रत पोचतील असं मला प्रामाणिकपणं वाटत नाही. धूम्रपान, मद्य यांच्या बाबतीत मला स्वतःला जरी त्या गोष्टींची चटक नसली तरी वेळप्रसंगी मी या गोष्टी नाकारीन असं मला वाटत नाही, नाकारीतही नाही. मी या गोष्टी नाकारीत नाही अशा अर्थानं की मी या गोष्टी निषिद्ध मानीत नाही. आणि एखादी सुंदर स्त्री मला दिसली तर मी डोळे झाकून, तिचं अवलोकन पापांत जमा करीत नाही. मी तिच्याकडे पाहतो. अर्थात मला असं म्हणायचं नाही की यात काही मोठेपणा आहे. पण हे पापच आहे असं मी मानीत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीअवघड आहे पण चैतन्यशील.पोहोचू का आपण तिथपर्यंत.