अंक : आनंद, फेब्रुवारी १९३७
लेखाबद्दल थोडेसे : आनंद या नियतकालिकात १९३७ साली ज्ञानपरंपरांची माहिती देणारी लेखमाला प्रसिद्ध झाली होती, या आधी त्या लेखमालेतील चार भाग आपण वाचले आहेत. (नसतील वाचले तर 'ज्ञानसागरावरील सफरी' हे शीर्षक सर्चमध्ये टाकून ते मिळतील. ते अवश्य वाचा) जवळपास ८५ वर्षांनीही ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. कदाचित काळ जसजसा पुढे जाईल तशी ही माहिती अभ्यासकांच्या दृष्टीने अधिकच उपयुक्त ठरेल. 'विज्ञापीठ' या संकल्पनेचा भारतीय संस्कृतीमधील उगम, पुढे ब्रिटिशांच्या काळात त्यांची गरज म्हणून आलेली विज्ञापीठ परंपरा आणि तिचा विस्तार याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती या लेखात आहे.
********
ज्ञानसागरावरील सफरी-५
‘युनिव्हर्सिटी’ हा शब्द आपल्या वाचनांत नेहमी येतो. याचा मराठी अर्थवाचक शब्द ‘विद्यापीठ’ हा होय. विद्यापीठ ही संस्था फार प्राचीन आहे. ह्या संस्थेचा उगम जर आपण शोधू गेलों तर धर्मगुरूंच्या आश्रमापर्यंत आपणांस जावे लागेल. एखाद्या रानांत एक मोठे विद्वान तपस्वी ऋषी असावयाचे. त्यांच्याकडे ज्ञानसाधनेसाठी चारही दिशांनी शिष्य गोळा व्हावयाचे आणि मग तेथे विद्येचे संतर्पण चालावयाचे. विद्वान् आचार्यांच्या चरितार्थासाठी आणि विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी राजेरजवाडे जमिनी देत आणि पैशाची मदत करीत. कित्येक राजकुमारही या आश्रमाच्या विद्यापीठांत शिक्षणाकरीतां राहत असत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .