चौघंजण

पुनश्च    सचिन कुंडलकर    2021-04-21 06:00:03   

चित्रपट बनवणं म्हणजे एक संपूर्ण ताजी आणि नवीन मूल्यव्यवस्था उभं करण्याचं काम आहे. दिग्दर्शक म्हणून आपला ज्या मूल्यांवर आणि तत्त्वांवर विश्वास आहे त्याची बाजू घेऊन आपण चित्रपटाची कथा सांगत असतो. इतर कुणीही त्या चित्रपटाची बाजू घेतली नाही तरीही तो चित्रपट तयार झाल्यापासून आपल्या आयुष्याचा शेवटापर्यंत दिग्दर्शकाला त्या चित्रपटाची बाजू घ्यावीच लागते. आणि त्याचमुळे एखादा चित्रपट बनवणे हे फार जबाबदारीचे काम आहे.

मला सुमित्रामावशींच्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या पात्ररचनेत विलक्षण ताकद जाणवते. त्या चित्रपटांमध्ये जी मूल्यव्यवस्था त्या तयार करतात त्याने प्रेक्षकाला आत्मभान येते. ते आत्मभान मिळण्याचा अनुभव त्यांचा चित्रपट मला वारंवार देतो. ‘दोघी’मधल्या गौरी आणि कृष्णा, ‘वास्तुपुरूष’मधली आई, ‘नितळ’मधली डॉक्टर निरजा, ‘दहावी फ’ या चित्रपटातले शिक्षक, ही सर्व पात्रं आणि चित्रपटामध्ये त्या पात्रांनी आपापल्या आयुष्याचे घेतलेले निर्णय मला नेहमीच स्तिमित करतात. सुमित्रामावशींचा चित्रपट हा त्या निर्णयांचा चित्रपट आहे. त्यांच्या चित्रपटातली सर्व पात्रे आपला स्वाभिमान न दुखावता आपल्या आणि सोबतच्या व्यक्तिंच्या आयुष्याची एक संतुलीत रचना करतात आणि जगण्याचं बळ देतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून मला त्यांचे चित्रपट हे ह्या काळातले फार महत्त्वाचे असे चित्रपट वाटतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. sumitra jadhav

      4 वर्षांपूर्वी

    विचारात पाडणारे चित्रपट अनेक धाग्यांचा गोफ विणणावा तसे असतात. या लेखातूनही जणू आपण चित्रपटच पहात आहोत असे वाटते.

  2. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर आणि प्रामाणिक लिखाण! आवडलं. तुमच्या सर्व चित्रपटांतून तुमची सौंदर्यदृष्टी आणि मानवी नात्यांबद्दलचं कुतूहल दिसतं. शुभेच्छा.

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    कुंडलकरांची लेखणी छान आहे . त्यांचे नाईन्टीन नाइन्टी हे पुस्तक मी वाचले आहे . छान लिहितात . सुमित्रा भावेंवरचा लेख सुंदर आहे

  4. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख !!

  5. Lata Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    सुमित्रा भावे!! तेथे कर माझे जुळती

  6. anagha vahalkar

      4 वर्षांपूर्वी

    Nice!

  7. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    अगदी मनापासून लिहिले आहे

  8. Bhagyashree Chalke

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर लेख. अशाच दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटसृष्टी आज श्रीमंत आहे.

  9. Sudhir Dhone

      4 वर्षांपूर्वी

    Great!

  10. sonali kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    किती विलक्षण लिहीलं आहेस सचिन..! हा लेख दीर्घकाळ मनात रेंगाळणार.. चांगलं लिहील्याबद्दल आभार मानले तर लिहीणाऱ्या माणसाला काही वाटेल का.. माहिती नाही.. पण तरी..भाषा, रचना आणि मुख्य म्हणजे नात्यांकडे इतक्या गोड, शहाण्या दृष्टिकोनातून कसं बघतोस.. ♥️



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen