आंबट आणि गोड महाराष्ट्र

अंकः मौज दिवाळी, १९५७

मराठ्यांचा संकोचीपणा आणि माणुसघाणेपणा यांचे सर्वांत उत्कृष्ट प्रतीक म्हणजे पुण्यांतले वाडे. मी पुण्यास आलो तेव्हा प्रथम माझे लक्ष वेधून घेतले ते या वाड्यांनी. अशा एका वाड्याचे दार कुठे आहे, ते प्रथम मला शोधावेच लागले. सभोवतींच्या तटवजा भिंतींत कुठे तरी एखादे भोक असावे, तसे हे दार बसवलेले होते. सापडले आणि मी आंत शिरलो. आंत एखादे छोटेसे अंधारे घर असेल अशी माझी कल्पना. पण त्याऐवजी एक मोठा चौक आणि त्याभोवतींच्या इमारतीला असलेली अनेक दारे पाहून मी चकितच झालो. कांही वाड्यांत तर छोटे बगीचेसुद्धा मी पाहिले आहत. चौकशी केल्यावर मला कळले की चौकाभोवतींच्या त्या प्रत्येक दारापलीकडे वेगळी चूल असते; वेगळे कुटुंब राहत असते. म्हणजे हा प्रत्येक वाडा हे एक ‘सांघिक घर’ असते म्हणायचे! गेली दहा वर्षे मी इथे आहे, पण तटबंदीच्या आड दडणाऱ्या आणि चोरदरवाजे असलेल्या या वाड्यांमध्ये अजूनही मला अस्वस्थ वाटते. अल्लादिनाच्या चिनी नगरींत किंवा डेस्टोईव्हस्कीच्या कादंबरींतली अंधाऱ्या बोळांमध्ये आपण वावरतो आहोंत असा भास मनाला होत राहतो. भूतकाळांत हे सगळे संरक्षणासाठी आवश्यक असेल, पण आतं ती भीती नाहीशी झाल्यावर हे वाडे नाहीसे करून, त्या जागी मोकळ्या हवेसाठी भरपूर खिडक्यादारे असलेली खरी घरे बांधायला काय हरकत आहे? नव्या तऱ्हेच्या आक्रमकांना तोंड द्यायला हे वाडे नाही तरी असमर्थच ठरतील.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .

मौज , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

 1. Mukund Deshpande

    7 दिवसांपूर्वी

  एकांगी लेख,

 2. Shriniwas Lakhpati

    2 आठवड्या पूर्वी

  केवळ दहा वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यावर लिहीलेला एकांगी लेख. हा लेख वाचून त्यावेळी कुणी फटकावलं नाही हे ह्या लेखकाचे हे भाग्यच म्हणायला हवे. आणि ज्या काळात हा लेख लिहीलाय तो काळ "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा" आहे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न -- बेळगाव प्रश्न ही सुध्दा किनार आहे. त्याविषयीचा एक चकारसुध्दा ह्या लेखात नाही. मग माझ्या मनात आले की, आमच्या एखाद्या मराठी माणसाने कर्नाटकातील त्याच्या दहा वर्षांच्या वास्तव्यावर " कर्नाटकावर / कानडी माणसांवर" असा लेख लिहीला असता तर चालले असते का ? ह्याचे उत्तर "मुळीच नाही " हे आहे. --------------------------------------------------------- ॲडमिन साहेब.... तुमच्याकडे भलेही जुन्या लेखांचा साठा असेल. पण तो पुन्हा-एकदा डिजिटल स्वरूपात इथे आणताना दहावेळा विचार करावा. उगीचच वैविध्याच्या नांवाखाली काहीही आणू नये. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

 3. Aparna Ranade

    2 आठवड्या पूर्वी

  छान लेख

 4. Suresh Kulkarni

    2 आठवड्या पूर्वी

  गुजराती मारवाडी लेखकांचे मराठी मनसाबद्दलचे असेच निरीक्षण असणारे लेखही द्यावेत.

 5. Prathamesh Kale

    2 आठवड्या पूर्वी

  बिचारा!त्याला मराठी माणूस म्हणुन पुणेकर भेटले.दुसरीकडे कुठे राहिला असता तर त्याचे विचार कदाचित वेगळे असते.

 6. Shriram Bhide

    2 आठवड्या पूर्वी

  पुणेकरांचे, "महाराष्ट्रीय" असे सार्वत्रीकरण (generalisation) करणे व पुणेकरांचे आलेले अनुभव महाराष्ट्रीयनांचे म्हणणे हा लेखकाचा अल्पानुभव मानायचा कि पुणेकरांचा अपमान हे सांगणे अवघड आहे. छापायला सोपे म्हणून मी यांस पुणेकरी अनुभव म्हणतो. १९५७ पूर्वी दहा ते पंधरा वर्षे आलेला पुणेकरांचा अनुभव व्यक्तिविशेषणात मात्र अजूनही कालबाह्य झालेला नाही. पुणेकरांवरील फिरणारे विनोद व, "तुम्ही काय वाट्टेल ते म्हणालात तरी चांगले शिक्षण घ्यायला, चांगली नोकरी करायला व रिटायरमेंटला इथेच यायचा जीवाचा आटापिटा करता ना? मग खुषाल तोंडाला येईल ते बोला! आम्ही असेच आहोत!" या पिड्यान् पिढ्या कमावलेल्या वृत्तीने केलेला पलटवार यात फारसा बदल झालेला नाहीये. चुका काढण्याची / चोखंदळ वृत्ती, सहजी विश्वास न दाखविण्याची / तावून सुलाखून , जोखून मगच संपूर्ण विश्वास टाकण्याची सावध वृत्ती; सौंदर्याचा आस्वाद न घेता चुकाच शोधायची वृत्ती/ सौंदर्यात, शुद्धतेत तडजोड न करण्याची वृत्ती असे अवगुण (इतरांच्या दृष्टीने) / गुण ( पुणेकरांच्या मते) असे हवे त्या चश्म्यातून पुणेकरांस बघायला सर्वजण मोकळे आहेत. कारण मुळातच पुणेकर इतरांच्या त्याच्याबद्दलच्या मतांना शून्य किंमत देतो ( पुणेरी शब्दात फाट्यावर मारतो!) आता कळले का ६५ वर्षांऩतरही हा लेख किती समर्पक आहे? 😀😀 श्रीराम भिडे अर्थातच पुणे! 😃😃

 7. Shriram Bhide

 8. मंदार केळकर

    2 आठवड्या पूर्वी

  खूप वेगळा विषय, मजेशीर लेखवाचण्यासारखे अजून काही ...