प्रकाशनव्यवसायातील खाचखळगे


अंक : ललित, जून १९६९

लेखाबददल थोडेसे : मराठी प्रकाशन व्यवसाय हा एक अजब व्यवसाय आहे. प्रकाशन व्यवसायाच्या इतिहासात कुठल्याही प्रकाशकाने आपला व्यवसाय उत्तम चाललेला आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही. परंतु दर वर्षाला नवे प्रकाशक येत असतात, शेकड्यांनी पुस्तकेही प्रकाशित होत असतात. सत्य काय ते प्रकाशकांनाच ठाऊक. १९६९ साली घेतलेली प्रकाशक वामनराव भट यांची ही मुलाखत अक्षरशः अशीच्या अशी 'आज घेतलेली' म्हणून प्रसिद्ध केली आणि त्यात कुठल्याही प्रकाशकाचे नाव टाकले तरी मजकुरात फार फरक पडणार नाही.

********

‘अभिनव प्रकाशनचे श्रीवाविभट यांची श्रीभानू शिरधनकर यांनी घेतलेली मुलाखत

पुस्तकांची जाहिरात करणे जरूर असतेच. जाहिरातीचा उपयोग होतो. पण त्यालाही मर्यादा असतातच. शिवाय जाहिरातींचे आजचे दर पाहिले तर माझ्यासारख्या मर्यादित शक्तीच्या प्रकाशकाला ते परवडतही नाहीत. तेव्हा निरनिराळ्या माध्यमांतून पुस्तकांची जाहिरात करावी लागते. वर्तमानपत्रांतून चर्चा होतील, वादळ उठेल असे काही करता आले तर ते अधिक उपयोगी ठरते. (उदाहरणार्थ, वासूनाक्यावरील चर्चा, टीका, झोड वगैरे.) आणि अशा वादळांचा त्या ग्रंथकाराच्या दुसऱ्या पुस्तकांनाही फायदा मिळू शकतो. आजकाल अधूनमधून पुस्तकप्रदर्शने, जत्रा फिरते दौरे वगैरे कार्यक्रम काही प्रकाशनसंस्थांद्वारे होत असतात. पुस्तकविक्रीच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे उपक्रम स्तुत्य आहेत. ठाण्याचे श्री. टिळक यांनी हल्ली जो ‘बुकक्लब’चा उपक्रम सुरू केला आहे तोही मला या दृष्टीने स्वागतार्ह वाटतो. 

 मला शरच्चंद्रांची एक आठवण सांगितली होती. शरदबाबूंची पुस्तके हजारोंनी खपत. त्यांचे काही प्रकाशक त्यामुळे ठरल्यापेक्षा अधिक प्रती काढून शरदबाबूंना दाद लागू देत नसत. पण एकदा शरदबाबूंनी प्रकाशकाला धडाच शिकवण्याचे ठरवले. त्यांनी त्याला सांगितले की तू कितीही प्रती काढ; पण मी प्रत्येक प्रतीवर सही करीन. शरदबाबूंनी मग तसे जाहीरच करून टाकले की ‘माझ्या नव्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीवर मी सही करणार आहे. माझी सही नसलेली प्रत अधिकृत समजू नये व ती चोरटी आहे असे मानून ती कुणी विकतही घेऊ नये.’ प्रकाशकाचे त्याबरोबर धाबे दणाणले. तो शरदबाबूंना म्हणाला, ‘आपण अशा किती सह्या करीत बसणार?’ शरदबाबूंनी त्याला म्हटले, ‘का? तू मर्यादित प्रती काढीत असतोस ना? मग तेवढ्या प्रतींवर मी सह्या करू शकेन. आणि समज, सह्या करून माझा हात मोडून गेला तरी चालेल. तू त्याची पर्वा करू नकोस.’ मामांकडे शरदबाबूंच्या सहीची एक प्रत होती, ती त्यांनी मला दाखवलीही होती.’’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मुलाखत , अनुभव कथन , उद्योग
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    शरदःचंद्राची ओळख भटांमुळे झाली. मात्र श्री. नेमाडेन्नी या व्यवसायावर बरंच काही लिहिले आहे!"मराठी साहित्य म्हणजे झोपडपट्टी आहे!"हे मत अतिरेकी असले तरी चिंत्य आहे! मात्र मला जास्ती करून वाचनालयामधेच पुस्तके खपतात हे माहिती असून पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांबद्दल आदरच आहे!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen