शिवाजीमहाराजांच्या सर्वच बखरी स्तुतीपर आहेतत. निःपक्षपाती सत्यकथन हे ध्येय बखरकार ठेवू शकले नाहीत. तत्कालीन मराठी आणि फारसी इतिहास राजाच्या पराक्रमांचे गुणगान करण्याकरीतां लिहिले गेले. घटना घडल्या तशा सांगण्याचे ध्येय बाळगणारा फेरिस्ता अनेक प्रसंगी इस्लामीधर्माला गौरवितो आणि आपल्या धन्याची स्तुती करतो. इतिहास लिहिण्यांत नेहमी स्वामीगौरव, स्वपक्षाची तरफदारी, स्वधर्माचा डंका वाजविणे अशासारखा हेतू असल्याचे आढळून येते. आधुनिक राष्ट्रीय इतिहासांत स्वराष्ट्राची स्तुती, तरफदारी वगैरे पक्षपाती धोरण भरपूर प्रमाणांत दिसून येते. निर्हेतुक, निर्भेळ सत्याकरीता लिहिलेले इतिहास पूर्वी आणि आतांही संख्येने फार नाहीत. राजदरबारी सेवा करून लेखन करणारे बखरकार राजगौरवाकरीता लिहीत ह्यांत आश्र्चर्य ते काय?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीउत्तम.
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीउत्तम , माहितीपूर्ण !!