अंक - वाङ्मय शोभा, मार्च १९६६
लेखाबद्दल थोडेसे : 'अत्तरवाले केळकर' या दोन शब्दांचा सुगंध एकेकाळी मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. उद्योगाच्या क्षेत्रातली अशी अनेक अभिमानास्पद मराठी नावे कालौघात लयाला गेली किंवा काळाच्या शर्यतीत मागे पडली. केळकरांनी मात्र 'अत्तरवाले केळकर' या दुकानदारीची आठवण करुन देणाऱ्या शब्दांना मागे सारत सुगंधाचा मोठा उद्योग उभारला आणि तो आजतायगायत उत्तमरित्या सुरू आहे. केळकरांना पुढे वझेंची साथ मिळाली आणि त्यातून 'वझे केळकर' हे समीकरण जन्माला आले, त्याचे भव्य शैक्षणिक संस्थेत झालेले रूपांतर आपण पाहतोच आहे. मात्र केवळ अत्तरे निर्माण करण्यापासून सुरु झालेला केळकरांचा उद्योग आता औद्योगिक सुगंध निर्मितीत आघाडीवर असून 'केवा' या नव्या नावाने आजही डौलात काम करतो आहे. या केळकरांचे साम्राज्य नुकतेच वाढत असल्याच्या काळात, १९६६ साली तेंव्हाचे संचालक भाऊसाहेब केळकर यांची घेतलेली ही अतिशय सुंदर अशी मुलाखत आहे. सुंगंध, सुगंधाचे प्रकार, सुगंध निर्मितीची प्रक्रिया याविषयीची हा माहिती आजही तेवढीच रंजक, उद्बोधक वाटेल-
********
सुरुवातीस त्यांनी सुवासिक साबण, सुगंधी तेले, पेनबाम, तोंडाला लावण्याच्या पावडरी व क्रीम बनविण्याचा धंदा सुरू केला. गिरगांवांतील एका जुन्या चाळीच्या दोन खोल्यांत त्यांचा हा धंदा चाले. हा माल तयार करण्यासाठी त्यांना जो कच्चा माल म्हणजे सुगंधी अर्क लागत ते, ते परदेशांतून आणवीत असत. पण तसले अर्क इथेच तयार करण्याचे मात्र तेव्हांपासूनच त्यांच्या मनांत घोळत होते व तसे त्यांचे प्रयत्नही चालूच होते.
त्यांच्या तयार मालाचा खप दरम्यान खूपच वाढला होता. त्यावेळी त्यांनी तयार केलेल्या टॉयलेटच्या कांही वस्तू लोकप्रियसुद्धां झाल्या होत्या. पण सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनाच्या व्यवसायांत पुढें स्पर्धा फार होऊ लागली. तसली प्रसाधने तयार करणारे अनेक कारखाने निघाले म्हणून आपल्या कारखान्यांतील तो विभाग बंद करून त्यांनी, असल्या प्रसाधनांना लागगगणारे मूळ सुगंधी अर्क तयार करण्याच्या कामीच जास्त लक्ष घातले. त्यांच्या कडूनच सुगंधी अर्क विकत घेऊन इतर जे कारखानदार सुगंधी प्रसाधने बनवीत त्यांच्याशींच स्पर्धा करीत बसण्यापेक्षां त्यांना मूळ अर्क विकण्याचाच धंदा करण्याचे त्यांनी ठरविले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Shubhangi Kadganche
4 वर्षांपूर्वीछान माहितीपर लेख.
Prashant Sabade
4 वर्षांपूर्वीमहितिपर लेख...खुपच छान