सांगायचा मुद्दा असा की मराठी मन, मराठी संस्कृती ही व्यापक मानवी मन अगर भारतीय संस्कृती यांच्याशी विसंगत नसून, त्यांत थोडेसे वैशिष्ट्य आहे हे नाकारण्यांत वैचारिक व्यापकता दिसेल, पण सत्य झांकले जाईल. प्राचीन कवींनी, संतांनी, प्रवाशांनी मराठी समाजाचे विशेष लिहून ठेवलेले आहेत. मराठ्यांसारखे दिले वचन पाळणार नाहीत. पण त्यांच्यासारखे दीर्घद्वेषी शत्रूही नाहीत. मानाच्या चिंधीसाठी शिर समर्पण करतील; प्रतिष्ठेसाठी करण्याचे काहीही शिल्लक ठेवणार नाहीत.
या मातीचे पुण्य असे की हिच्या मुलांनी
अन्यायाच्या पुढे झुकविला कधी न माथा।
ही एका विद्यमान कवीची उक्ती हे वैशिष्ट्यच दाखविते. तात्पर्य, ज्याला जसे वाटते तसे त्याने मराठी संस्कृती व मराठी मनाचे वर्णन केले आहे. “ज्यास जैसे समजले। तैसेच त्याने विवेचले। परंतु विचारे विवेके। घेतले पाहिजे।।” ही समर्थांची दृष्टी वागण्यांत औचित्य आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीफारच छान. भाषाही मार्मिक.
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीक्लिष्ट भाषा त्या काळची. काय म्हणायचे हे समजत नाही.