अंक – सत्यकथा, मे १९५१
तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे प्रचंड पहाड उभे राहिले. सर्वत्र मोठी झाडी नि हिरवीगार कुरणे होती. डोंगरापलीकडून उन्हाचे पट्टे येत होते, डोंगरावरून सोसाट्याचा वारा वहात होता. पायथ्याच्या पाणथळांत पारू डुंबत होती.
तेवढ्यांत रामशरणने शिताफीने तिच्या गळ्यांतल्या दोराचे टोक पकडले. एक शिवी हांसडून तो दोर ओढूं लागला. मागच्या माणसाने तिची शेपटी पिरगळली व तला धक्का दिला. इमारतींच्या खिडक्यांतून कपडे घातलेली कोवळी मुले व मोठी माणसेही कुतुहलाने म्हशीची ही मजा पहात होती.
पारू मुकाटपणी चालत होती. मारायला उठलेली माणसे व डरकाळ्या फोडणाऱ्या मोटारी यांचे तिला भारी भय वाटे. गोरेगांवहून येतांना अशा असंख्य गाड्या तिला भेडसावून गेल्या होत्या आणि ग्रांटरोडच्या बाजारांत मगरूर माणसांनी तिला छेडलं होतं. एकेका आठवणीनं ती चारी पाय झपझप उचलूं लागली.
लेखक – अरविंद गोखले
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीखूपच कारुण्यपुर्ण.
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीसुंदर.
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीखरच बिचार्यांची अशीच वणवण होते पण कोण थांबवणार
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीवाह, फारच छान,
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीवाह, फारच छान,
Shrikant Athalye
4 वर्षांपूर्वीआम्ही गोरेगावचे. हे सर्व वर्णन १०० टक्के तंतोतंत सत्य आहे.यात काडीमात्र अतिशयोक्ती नाही.