अंकः मौज दिवाळी, १९५७
मला आठवण झाली, एका निराळ्याच थरांतल्या मराठी स्त्रियांची. पुष्कळ आंग्लविद्याविभूषित, श्रीमंत, पाश्र्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या महाराष्ट्रीय स्त्रियांची. त्या कोणत्याही तऱ्हेचा पोशाख करतात. रंगसफेतीशिवाय तोंड दाखवीत नाहीत. फाडफाड इंग्रजी बोलतात. इंग्रजांच्या पद्धतीनं. तोंडांतल्या तोंडातां. दर वाक्याला ‘थँक यू’. आणि मान वाकडी करून ‘हौ लव्हली’, ‘हौ स्वीट’ असं अधून मधून लचकत म्हणत राहतात. इंग्रज बाईसारखे केस कापायचे. तिच्यासारखी सिग्रेट ओढायची. वेळप्रसंगी आपल्या मित्राची सिग्रेट चटकन् पेटवून द्यायची. मद्यपान करायला माघार घ्यायची नाही. मोटार चालवण्यांत हटायचं नाही. कसला ना कसला वनोद करून अंगाला झोके देत खिदळत राहायचं. हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. हे असं केलं म्हणजे आपण सुधारक, उच्च संस्कृतीच्या, असा त्याचा विश्र्वास आहे. आपल्या महाराष्ट्रीय चालीरीती पाळणं हा त्यांना अडाणीपणा वाटतो. शहरांतल्या खास विभागांत राहणाऱ्या बऱ्याच श्रीमंत स्त्रियांची संस्कृती खरोखरीच पाश्र्चात्य वळणाची आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
लेख वाचून तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला.... १९५७ साली पुण्याहून मुंबईला नोकरीसाठी रोज बाई, तिच्या घरी स्वैपाकाला बाई, प्रीतिविवाह सर्रास होत असावेत.... आश्चर्य वाटलं.. “तिच्यासाठी दोन पौंड पाव घेत असे”... त्यावेळी पाव पौंडात मिळत असावा... दशमान पद्धती नंतर लागू झाली.. दोन पौंड पाव म्हणजे किती याचा अंदाज बांधता येत नाही...