अंक : मौज, १९५८
नाही म्हटले तरी गांवांत आतां कांही सुधारणा हळूहळू दिसून येऊं लागल्या आहेत. गांवांत चोरदोन घड्याळांनी प्रवेश केलेला आहे. पण दोन घड्याळे कधीच जुळत नसतात याचा खरा प्रत्यय खेड्यांत येतो. आणि घड्याळाचा उपयोग क्वचितच होतो. एकाद्या बागाईतदाराच्या मनगटावर घड्याळ असले तरी त्यांनी सांगितलेली वेळ कोणाला पटत नाही! “काय सांगताय् राव, घड्याळ हाय का चुन्याचं डबडं हाय?” असे म्हणून लोक दिवसाकडे बघून वेळ निश्चित करतात. दिवस आणि रात्रीच्या घड्याळाचे काटे यांना बरोबर कळतात. घंटा होण्यापूर्वी शाळेत जाऊन ‘येणें मार्क’ मिळविण्याची घाई असलेली मुले उन्हांत वीत आणि मूठ घालून काली पडणारी सावली बोटांच्या फुटपट्टीने मोजून वेळ ठरवितात आणि पाटीदप्तर काखोटीला मारून शाळा उघडण्याच्या आधीच तेथे हजर होतात. त्यांचे ‘येणे मार्क’ सहसा चुकत नाहीत. एस्.टी. आणि रेल्वेवांचून फारसे कुणाचे अडत नव्हते, पण अलीकडे ही वाहने बोकाळून लोकांची चालण्याची जुनी संवय नाहीशी होऊं लागली आहे. या नव्या घाणेरड्या सवयीबद्दल कांही जुन्या लोकांना हळहळही वाटते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीकथा वाटत नाही.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीशंकर पाटील यांची कथा वाचताना अगदी जुन्या गावी गेल्याचा भास झाला