अंकः मौज, दिवाळी १९५९
दिवसामागून दिवस लोटले तरी झोला परत येईना तेव्हा नर्मदा अस्वस्थ झाली. तिला सर्वत्र अपशकुन होऊ लागले. दूताकडून तिने जोलेची हकीकत ऐकली. सौंदर्यांत, ऐश्र्वर्यांत, गुणांत आपल्या पासंगालाही पुरणार नाही अशा झोलेचे ते धारिष्ट पाहून नर्मदा संतप्त झाली. शोणाच्या चंचलतेची तिला चीड आली. तिचा पूर्वीचा उल्हास कुठल्या कुठे गेला. ती बेफामपणे धावूं लागली. धावत धवात ती शोणाच्या मंदिरांत आली. तिथे तिने जो प्रकार पाहिला त्याने तर तिचा राग पराकोटीला गेला. चवताळून तिने एक लाथ त्या बेइमान दासीच्या कंबरड्यांत मारली व दुसरी शोणाच्या कंबरेंत. ती लाथ एवढी जबरदस्त होती की तिने बलाढ्य शोणही खाली कोसळला. त्याने नर्मदेची क्षमा मागितली. झोलेला हांकलून देण्याचे आश्र्वासन पण दिले. तरी नर्मदेचा संताप कमी होईना. “तुझ्यासारख्या हरामखोराशी मानी नर्मदा कधींच लग्न करणार नाही. मला कलंकित पती नको. पुरुषजात ती सारी अशीच काय? आतां माझा निश्र्चय पाहा. मी जन्मभर कुमारीच राहीन. तूं मुकाट्याने या भिकारडीला घेऊन चालता हो.” नर्मदा म्हणाली. शोण एवढेसे तोंड करून झोलेसकट चालता झाला. नर्मदा जी पूर्ववाहिनी होण्यास उत्सुक होती, तिने पश्र्चिमेकडे म्हणून वळवले नाही. अमरकंटकला तिची मूर्ति पश्र्चिमाभिमुखीच आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मौज
, स्थललेख
, ललित लेख
स्थल विशेष
Amol Suryawanshi
2 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर. असे वर्णन करण्यासाठी किती खोलवर चिंतन असेल याची जाणीव होते.
sumitra jadhav
4 वर्षांपूर्वीजणू नर्मदा नदीने आपले मूळ गूढ स्वरूप दाखवावे आणि आपले डोळे भरून यावेत असा लेख !
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीइतकं सुंदर पण वेगळ्या विचारांचं नर्मदेचं वर्णन प्रथमच वाचलं
Pradnya Sathe
4 वर्षांपूर्वीमा. दुर्गाबाईंना वंदन .
Sai Lele
4 वर्षांपूर्वीअचंबित करणारी भौगोलिक वैशिष्ट्ये ! प्रवासाची पुरेशी साधने नसताना दुर्गाबाई एवढ्या फिरल्या ,त्याने थक्क व्हायला होते.एवढे नितांतसुंदर लेखन वाचण्याचा योग तुम्ही आणलात,मनःपूर्वक आभार !
jyoti patwardhan
4 वर्षांपूर्वीविलक्षण लेख. अद्भुत गूढ भाव भरून राहिला आहे,
मंदार केळकर
4 वर्षांपूर्वीविलक्षण लिखाण !