भोगवाद आणि साहित्य - भाग ४

पुनश्च    ना. सी. फडके    2021-07-17 06:00:03   

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

असा एक आक्षेप उपस्थित करण्यांत येतो की, ‘भोगवाद’ माणसाला निसर्गतःच प्रिय आणि पसंत असतो, तो शिकवायला कशाला हवा? माणसाला त्याग नको असतो, त्याचे धडे साहित्यिकांनी द्यायला हवेत. परंतु ही कल्पना भ्रममूलक आहे. मनुष्य स्वभावतः आळशी आणि क्रियाशून्य आहे. हा नैसर्गिक आळस आणि ही क्रियाशून्यता वाढविणारी जी कोणती विचारसरणी असेल तिचा स्वीकार मनुष्य चटकन् करतो. परमार्थवाद सहजासहजी लोकप्रिय ठरतो याचं कारण हेंच आहे. ज्याला कधी कुणी पाहिलं नाही अशा परमेश्र्वराच्या सत्तेनं वस्तुमात्राचं नियंत्रण होत आहे, या जगांत न्यायाच्या-अन्यायाच्या, चांगल्या-वाईट ज्या कांही गोष्टी घडत असतील त्या सर्व त्या जगन्नियंत्या प्रभूच्या कृपेनं घडत आहे, म्हणून जे कांही वाट्याला येईल ते घ्यावं, अधिकाची इच्छा करू नये, आपल्या दैवांत नसेल ते कदापी मिळणार नाही आणि जे असले ते मिळाल्यावांचून राहणार नाही – ही विचारसरणी एकदां पत्करली की मानवी प्रयत्न नुसता व्यर्थच नव्हे, तर एक प्रकारे ईश्र्वरद्रोही ठरतो. समाज निष्क्रिय आणि आळशी बनतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हंस , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen