मराठी माणसाचा बुद्धिवाद


अंकः मौज दिवाळी, १९५७ 

अहंकार, अस्मिता ही व्यक्ती वा समाज किंवा राष्ट्र यांतील प्रवर्तक कारणे असतात. मराठ्यांना बुद्धीपेक्षा आचाराकडे जासत् लक्ष पुरवावेसे वाटते. याला सुशिक्षित माणसेही अपवाद नाहीत. उदाहरणार्थ, समाजशास्त्रज्ञ डॉ. इरावतीबाई कर्वे यांचे विचार पाहा. त्यांनी आपल्या एका लेखाला ‘मराठ्यांचा मठ्ठपणा’ असे संमतिपूर्ण शीर्षक दिलेले आढळते. “देवा, मारुतिराया, मराठ्यांना आणखी थोडे मठ्ठ कर रे” अशी प्रार्थना करताना त्या आढळतात. मराठी मनाचे त्यांनी केलेले विश्र्लेषण विश्र्वविद्यालयांतील पंडितांनाही आवडले असावे. कारण हे विवेचन असणारा लेखसंग्रह युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला दिसतो. उघड उघड व्यावहारिक फायदा असणार्या गोष्टी महाराष्ट्रीय माणूस बुद्ध्या कशा टाळतो याचे बाईंनी दिलेले उदाहरण सत्यच आहे. पण बुद्ध्या केलेली गोष्ट बुद्धिवादाची निदर्शक दिसत नाही. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज , इतिहास , समाजकारण
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Harihar sarang

      3 वर्षांपूर्वी

    अत्यंत परखड. मराठी माणूस अद्यापिही डोळ्यावरची झापडं काढायला तयार नाही.

  2. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अतीशय परखड पण सामान्य लोकांना पटायला कठीण असे यांचे विचार आहेत.

  3. Nivrutti Godase

      3 वर्षांपूर्वी

    कमालीचा भेदक आणि दाहक...पण विचार करायला भाग पाडणारा

  4. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    ज्याप्रमाणे काही हिण मिसळल्याशिवाय सोन्याचे दागिने होत नाहीत तसेच एव्हडे परखड सत्य कोणी नाही स्वीकारणार!शेजवळकरांनी पूर्ण दाहक सत्य मांडलेय ते सहन करण्याची शक्ती आणि सुबुद्धी सगळ्या जाती जमातीस होवो ही प्रार्थना ईशचरणी!

  5. Vilas Ranade

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय परखड चिकित्सा करणारा लेख आहे.

  6. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच माहिती पूर्ण - जिज्ञासा शमवणारा आणि डोळे उघडणारा लेख .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen