देशपांड्यांच्या साहित्यात रचना व अन्वय दोन्ही आढळत नाही. एखादे पेचदार कथानक, एखादी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा असे त्यांच्याजवळ काही नाही. फार काय संघर्षप्रधान समजल्या जाणाऱ्या नाट्य या प्रकारातदेखील त्यांचेजवळ कथानक-प्रधानता नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’ व ‘सुंदर मी होणार’ यात कसलेच घटनाप्रधान परिवर्तनशील कथानक नाही. त्यात प्रामुख्याने संघर्ष आहे तो वृत्तीचा. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांचे आयुष्य त्यांच्या साहित्यात घडत जात नाही. एखाद्या विशिष्ट क्षणी त्या व्यक्तिरेखांना आपण भेटतो व मग पुढील वर्णनाच्या ओघात त्या व्यक्तीची जडणघडण केवळ फोटोग्राफिक अशा कौशल्याने देशपांडे आपल्या पुढे उभी करतात. यामुळे त्यांची कोणतीही व्यक्तिरेखा अधांतरी वाटत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .