अंक – उद्यान, फेब्रुवारी १९१९
लेखक – रा. रा. वाग्भट नारायण देशपांडे, बी.ए., एल्.एल्.बी.
********
गेल्या तीस वर्षांचा आपल्या समाजाचा इतिहास पाहिला असतां जातिभेदाची तीव्रता उत्तरोत्तर कमी होत जाऊन रोटीबेटीव्यवहाराचं प्रतिबंध दूर होण्याचा काळ केव्हा तरी येणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तीस वर्षांपूर्वी सामाजिक सुधारणेच्या ज्याकल्पनांचा बहुजनसमाजास विटाळ सुद्धां खपत नव्हता आणि ज्याबद्दल त्या कल्पनांचा पुरस्कार करणाऱ्यांची हल्ली मिश्रविवाहाला अनुकूल असणाऱ्यांप्रमाणेच कुचेष्टा होत असे, त्या सुधारणा हल्ली समाजांत राजरोसपणे वावरत असून त्यांत नवीन असे आतां कांहीच वाटेनासे झाले आहे. हा प्रगतीचा ओघ येथे थांबणार आहे असे नसून कालाच्या ओघाबरोबर व शिक्षणाच्या वाढीबरोबर याची गतीही पुढेच जाणार. पटेल बिलाच्या आक्षेपकांपैकी पुष्कळजण हे सर्व म्हणणे मान्य करून यावर असा सवाल करतात की असे आहे तर मग याला कायदा कशाला पाहिजे?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .