अलिकडे ‘कॉम्पिअर’ नावाची नवी जात निर्माण झाली आहे. लाडे लाडे भाषण करून कधी वक्त्याच्या मुद्द्यांवर उड्या मारून हे ‘सूत्रसंचालक’ श्रोत्यांना अक्षरशः पिडत आणि पिळत असतात. अनेक समारंभात श्रोत्यांचा अंत पाहणारे हे ‘कॉम्पिअर्स’ पाहिले आणि ‘मोकाट सुटलेली जनावरं’ हा विनोदी लेख लिहिला. वक्ता म्हणून वाशीला जायचं कबूल केलं होतं. मला घेऊन जायला आयोजक मंडळी चक्क ‘अँब्युलन्स’ घेऊन आली! त्यातून जाताना आलेले खरेखुर व काल्पनिक अनुभव मी ‘एक खडतर प्रवास’मध्ये मांडले. असे अनेक अनुभव. वाङ्मयीन विडंबनं सर्वसामान्य वाचकांना चटदिशी उमगत नाहीत. कारण त्यासाठी पार्श्र्वभूमी ठाऊक असावी लागते. असं असलं तरी विशिष्ट थरातल्या वाचकांना हे लेखन मनापासून आवडतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान ! मार्गदर्शन पर लेख . आवडला :