अमेरिकेत एकूण ५२ संस्थाने आहेत. त्यातील प्रत्येक संस्थानाने स्थानिक स्पर्धा घेऊन त्यात जी पहिला क्रमांक मिळवील तिचा राष्ट्रीय स्पर्धेत समावेश करण्यात येतो. यंदा ५१ संस्थानांनी तशी निवड केली. त्यात दोन नीग्रो स्त्रियाही होत्या! या देशव्यापी स्पर्धेचे परीक्षक अकरा असतात. यात यंदा पुरुषांपेक्षा स्त्रीपरीक्षक संख्येने अधिक होते. परीक्षकांतही दोन नीग्रो स्त्रिया होत्या! परीक्षेच्या कसोट्या म्हणजे शरीराची ढब, व्यक्तिमत्व, सायंकाळी फिरायला जाताना वापरण्यात येणारा पायघोळ पोषाख आणि पोहण्याच्या वेषात प्रत्येक स्त्रीचे शारीरिक दर्शन. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्त्रीची प्रथम मुलाखत घेण्यात येते. बोलण्याची ढब, शब्दोच्चार यांसारख्या गोष्टी प्रत्यक्ष मुलाखतीतच समजण्यसारख्या असतात. यानंतर मग परीक्षकांसमोर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vilas Ranade
4 वर्षांपूर्वीअमेरीकेतील स्त्री सौंदर्य स्पर्धेची साधारण सर्वांना माहिती असते.पण त्या त्या राज्यातील स्पर्धेत दलाल असतात,हे माहीत नव्हते.एकंदरीत ह्या सौंदर्यस्पर्धा म्हणजे स्त्री शरीराचा मांडलेला बाजारच आहे.